शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक खतांसाठी आता हेक्टरी १६०० रुपये अधिक मोजावे लागतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात धानासह भाजीपाला, गहू, हरभरा आदी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. पिकांच्या वाढीसाठी संयुक्त खतांची मात्रा दिली जाते. मात्र आता रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाट वाढ झाली आहे. प्रत्येक खताच्या किमतीत सरासरी २०० ते २५० रुपये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. धानासाठी हेक्टरी ८ बॅग रासायनिक खताची गरज असते. आता दरवाढीने हेक्टरी १६०० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.

ठळक मुद्देशेतकऱ्यांत संतापाची लाट

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : रासायनिक खतांच्या किमतीत झालेल्या भरमसाट वाढीने धान उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत. रासायनिक खतासाठी आता हेक्टरी १६०० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.भंडारा जिल्ह्यात धानासह भाजीपाला, गहू, हरभरा आदी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. पिकांच्या वाढीसाठी संयुक्त खतांची मात्रा दिली जाते. मात्र आता रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाट वाढ झाली आहे. प्रत्येक खताच्या किमतीत सरासरी २०० ते २५० रुपये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. धानासाठी हेक्टरी ८ बॅग रासायनिक खताची गरज असते. आता दरवाढीने हेक्टरी १६०० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. आर्थिक अडचणी असलेल्या शेतकऱ्यांना डिझेल दरवाढीसोबतच रासायनिक खतांच्या वाढीचाही मोठा फटका बसत आहे. यामुळे शेतकऱ्यांत संतापाची लाट निर्माण झाली आहे.एकीकडे शेतकऱ्यांच्या धान्याला योग्य भाव मिळत नाही. धान विकण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागते. विकलेल्या धानाचे पैसेही मिळत नाही. हाती आलेले पैसे मेहनतीच्या मानाने अतीशय तुटपुंजे असते. त्यातच डिझेल आणि खतांची दरवाढ शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत लोटणारी ठरु शकते. पुर्वी शेतकरी शेणखताचा मोठ्या प्रमाणात वापर करीत होते. परंतु अलिकडे शेणखत मिळणे कठीण झाल्याने सर्वच शेतकरी रासायनिक खत खरेदी करतात. खताची मात्रा दिली नाही तर शेतातुन अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. 

महागाईची हद्द झालीडिझेलचे दर दररोज वाढत आहेत. शेतीशी निगडित बहुतांश कामे आता ट्रॅक्टर व इतर यांत्रिक साह्याने केली जात आहे. मात्र दरवाढ झाल्याने शेतकरी आता परंपरागत पद्धतीने मशागत करण्याच्या तयारीत दिसत आहेत.

ट्रॅक्टरच्या मशागतीचा ८०० रुपये तासइंधनाच्या दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. डिझेलचे दर दररोज वाढत असल्याने मशागतीच्या खर्चातही वाढ झाली आहे. पूर्वी ट्रॅक्टरचे मशागतीचे दर प्रति तास ६०० रुपये होते. परंतु आता ८०० रुपये प्रति तास झाले आहेत. एका एकराला नागरटीपासून ते चिखलणीपर्यंत साडेतीन तास ट्रॅक्टर हवा असतो. पूर्वी २१०० रुपये एकरी खर्च यायचा. परंतु तो आता २८०० पर्यंत पोहोचला आहे. शेतकरी आता परंपरागत पद्धतीने बैलाच्या साहाय्याने मशागत करावी काय, अशा विचारात दिसत आहे.

खताच्या किमती वाढल्याने आमचे गणित बिघडणार आहे. आधीच लागवड खर्चही निघत नाही. निसर्गाचा प्रकोप आणि किडनीचा प्रादुर्भाव यामुळे धान उत्पादक अडचणीत आले आहेत. खताच्या किमती कमी करून दिलासा द्यावा.-ललीराम खंडाईत, दिघोरी (मोठी)

भंडारा जिल्ह्यात बहुतांश शेतकरी धानाची शेती करतात. धान पिकाला खताची मात्रा मोठ्या प्रमाणात लागते. परंतु आता २०० ते २५० रुपये दरवाढ झाल्याने आमचे बजेट कोलमडणार आहे. शासनाने खताचे दर तरी नियंत्रणात ठेवावे.-नामदेव आंबेडारे, पारडी

डिझेलचे दर वाढल्याने मशागत खर्चही वाढत आहे. शेतीचा दिवसेंदिवस खर्च वाढत असताना आता सर्वत्र महागाई दिसत आहे. परंतु शेतकऱ्यांच्या मालाला तीच किंमत मिळत आहे. यामुळे शेती हा घाट्याचा व्यवसाय झाला आहे.-माधवराव झोडे,  मुर्झा

धानासह सर्वच पिकाला रासायनिक खताची गरज असते. शेतकरी रासायनिक खत विकत घेतात. मात्र अलिकडे वाढत्या किमतीने रासायनिक खत विकत घेणे शेतकऱ्यांसाठी कठीण जाईल. त्याचा परिणाम उत्पन्नावर होईल.-विष्णूदास हटवार, चिखली

 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्र