बनावट स्वाक्षरीने धनादेश वटविले

By Admin | Updated: January 12, 2015 22:45 IST2015-01-12T22:45:38+5:302015-01-12T22:45:38+5:30

मच्छेरा येथील ग्रामीण पाणी पुरवठा योजनेतील विकास कामाचे देयक देतांना माजी अध्यक्षांच्या बनावट स्वाक्षरीने धनादेश वटविण्यात आले आहे. या प्रकरणी माजी अध्यक्ष नोकेश्वर

A check with a fake signature passed | बनावट स्वाक्षरीने धनादेश वटविले

बनावट स्वाक्षरीने धनादेश वटविले

चुल्हाड (सिहोरा) : मच्छेरा येथील ग्रामीण पाणी पुरवठा योजनेतील विकास कामाचे देयक देतांना माजी अध्यक्षांच्या बनावट स्वाक्षरीने धनादेश वटविण्यात आले आहे. या प्रकरणी माजी अध्यक्ष नोकेश्वर पारधी यांनी सिहोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तुमसर, बपेरा राज्य मार्गावरील दीड हजार लोकवस्तीच्या मच्छेरा गावात ग्रामीण पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेच्या विकास कामावरून आरोप प्रत्यारोप सुरु आहे. योजनेला सत्ता हस्तांतरणाचा फटका बसला आहे. वर्षभरात अध्यक्ष व सचिव या पदावर कार्यरत पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात येत आहे. ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या विकास कामाचे देयक देतांना पारदर्शकता ठेवण्यात येत नाही. यात बनावट स्वाक्षरीचा आधार घेण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. या योजनेचे २७ आॅक्टोबर २०१४ ला १० हजार रुपयांचे धनादेश क्रमांक ००००१९ चे धनादेश साहित्य पुरवठाधारकाला देण्यात आले आहे. या शिवाय ६ डिसेंबर २०१४ ला पुन्हा ००००२२ क्रमांकाचा १० हजार रुपयाची नोंद असणारा धनादेश देण्यात आलेला आहे. या दोन्ही धनादेशावर अध्यक्ष नोकेश्वर पारधी यांनी स्वाक्षरी केली नाही. परंतु ही दोन्ही धनादेश अध्यक्षांच्या बनावट स्वाक्षरीने सिहोरा येथील बँक आॅफ इंडिया शाखेतून वटविण्यात आली आहेत. दरम्यान अनुसया ट्रेडर्स च्या नावे दोन्ही धनादेश असून या ट्रेडर्स सोबत कसलाही आर्थिक व्यवहाराचे संबंध नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
याच कालावधीत २४ डिसेंबर २०१४ ला १२ हजार रुपयाचा धनादेश साहित्य पुरवठा धारकाला देण्यात आला आहे. या धनादेशावर अध्यक्षाची बनावट स्वाक्षरी असल्याचे निदर्शनास येताच धनादेश वटविण्यात आलेला नाही. परंतु या आधी दोन धनादेश वटविण्यात आले आहे. या प्रकरणाची तक्रार करण्यात आली असताना पोलिसांनी साधी चौकशी केली नाही.
बनावट स्वाक्षरीचा आधार घेत शासकीय निधीची लुट करण्यात आली आहे. असा आरोप आहे. दरम्यान सरपंच पदावरून उषा पारधी हे पायउतार होताच त्यांचे पती नोकेश्वर पारधी यांची ग्रामीण पाणी पुरवठा समितीच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्षपदावर प्रभारी सरपंच योगेश कोकुडे यांची वर्णी लागली आहे. तर प्रभारी सरपंच योगेश कुकडे यांच्या पत्नी आशा कोकुडे या जिल्हा परिषद सदस्या आहेत. यामुळे चौकशी करताना दिरंगाई होत असल्याचा आरोप आहे. (वार्ताहर)

Web Title: A check with a fake signature passed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.