आर.डी.च्या नावावर फसवणूक
By Admin | Updated: May 19, 2016 00:32 IST2016-05-19T00:32:15+5:302016-05-19T00:32:15+5:30
जे.एस.व्ही. डेव्हलपर्स इंडिया व जयविनायक बिल्डक्राप लिमी. या कंपनीचे सर्व संचालक व टॉप सिनीअर यांच्या ...

आर.डी.च्या नावावर फसवणूक
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : कोट्यवधींची अफरातफर
भंडारा : जे.एस.व्ही. डेव्हलपर्स इंडिया व जयविनायक बिल्डक्राप लिमी. या कंपनीचे सर्व संचालक व टॉप सिनीअर यांच्या सर्व संपत्तीची चौकशी करून ग्राहकाचे रक्कम परत करण्यात यावी असे निवेदन उपजिल्हाधिकारी डॉ.सुजाता गंधे यांना देण्यात आले.
जे.एस.व्ही. डेव्हलपर्स इंडिया व जयविनायक बिल्डक्राप लिमी. या दोन्ही कंपनीनी भंडारा शहरात गेल्या अनेक वर्षापासून सुरु असून या कंपनीमार्फत भंडारा जिल्ह्यातील ग्राहकांकडून आर.डी. व एफ.डी. च्या नावावर करोडो रुपये जमा करून दाम दुप्पट करून देतो म्हणून या दोन्ही कंपनीने रुपये जमा केले. गुंतवणूकदारांचे आर.डी. व एफ.डी. ची मुदत संपलेली आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदाराने भंडारा शहरात असलेले या दोन्ही कंपनीचे आॅफीस मध्ये चौकशी केल्यावर त्यांना तेथील आॅफीस कर्मीयांकडून उडवाउडवीचे उत्तरे दिले जात आहे.
सन २००९ पासून जे.एस.व्ही. डेव्हलपर्स इंडिया या कंपनीने सन २०१२ पर्यंत करोडो रुपये आर.डी. व एफ.डी.च्या नावावर गुंतवणूकदारांकडून घेतले. सन २०१२ मध्ये सेबी कडून या कंपनीला आदेश देण्यात आले की, घेतलेले ग्राहकांचे रुपये परत करून नवीन कोणतेही गुंतवणूक घेता येणार नाही. परंतु येथील संचालकांनी सेबीच्या आदेशाला न जुमानता नवीन जयविनायक गुडक्राप नावाची कंपनी उघडवून नवीन गुंतवणूक घेण्यास सुरुवात केली व सन २०१६ पर्यंत करोडो रुपयाचे गुंतवणूक वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावावर घेतले.
या दोन्ही कंपनीमध्ये काम करणारे टॉप सिनीअर करोडो रुपये गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्याकरिता प्रेरित करून त्याच्या मोबदल्यात कमीशन, सी.एम.डी. व बोनस या रुपाने कमाविले आहे. आज या सर्व व्यक्तीकडे करोडो रुपयाची संपत्ती जमा झालेली आहे. यात यांनी गुंतवणूकदाराचे लाखो रुपये स्वत:च्या व नातेवाईकांच्ळा खात्यावर जमा केले आहेत.
दोन्ही कंपनीचे संचालक व सिनीअर यांनी कंपनीची वेगवेगळ्या जिल्ह्यात घेतलेली संपत्ती विकत आहे. म्हणून दोन्ही कंपनीचे संचालक व सिनीअर यांच्या संपत्तीची चौकशी करून ती संपत्ती जप्त करून गरीब, मजूर, शेतकरी असे काम करणाऱ्या गुंतवणूकदाराची रक्कम परत करण्यात यावी तसेच अयोग्य रितीने गुंतवणूक घेणाऱ्या कंपनीवर तेथील संचालकावर, काम करणाऱ्या सिनीअर व कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करून योग्य ती कारवाई करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी भंडारा, पोलीस अधीक्षक भंडारा, पोलीस उपायुक्त नागपूर, पोलीस आयुक्त मुंबई, मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी रमेश येरपुडे, ज्ञानेश्वर निकुळे, रमेश बोंद्रे, ललू लुटे, शैलेंद्र बोंद्रे, रंजना गौरी, कन्हैया नागपुरे, प्रशांत रामटेके, ऋतिका कटरे, लीना जांगळे, पुष्पा शहारे, रेखा निनावे, गिरीधर गभणे, कल्पना जावळकर व वंदना ठाकरे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)