भूगर्भातील पाण्यासाठी चरांचे खोदकाम

By Admin | Updated: June 8, 2016 00:35 IST2016-06-08T00:35:41+5:302016-06-08T00:35:41+5:30

जलशिवार योजनेअंतर्गत कोका प्रादेशिक वन विभागाचे वतीने पहाडावर पडणारे पावसाचे पाणी सरळ उताराच्या दिशेने वाहून न जाता ...

Charcoal excavation for ground water | भूगर्भातील पाण्यासाठी चरांचे खोदकाम

भूगर्भातील पाण्यासाठी चरांचे खोदकाम

कोका वनविभागाचा पुढाकार : सालेहेटी, दुधारा येथे कामांना सुरुवात
करडी (पालोरा): जलशिवार योजनेअंतर्गत कोका प्रादेशिक वन विभागाचे वतीने पहाडावर पडणारे पावसाचे पाणी सरळ उताराच्या दिशेने वाहून न जाता जमिनीत मुरावे या हेतूने जंगलात समतल चराचे (डिपसीसीटी) खोदकाम हाती घेण्यात आले आहे. सुमारे ४८ हे.आर. क्षेत्रात ३.४२ लाख रुपये खर्चून जेसीबीच्या सहायाने समतल चरांचे खोदकामाला सुरुवात झाल्यामुळे भूगर्भात जलसाठा वाढण्यास मदत मिळणार आहे.
कोका प्रादेशिक वनविभागाचे वतीने कोका, सालेहेटी, दुशारा गावा शेजारील जंगल शिवार योजनेअंतर्गत पहाडींच्या पायथ्यांशी समतल चरांचे खोदकामाला सुरुवात करण्यात आली आहे. जेसीबीच्या सहाय्याने १ मिटर खोल, १ मिटर रुंद व जागेनुसार लांब चरांचे खोदकाम कोका येथे अंतिम टप्प्यात आहे. पहाडीवर पडणारे पावसाचे पाणी उताराच्या दिशेने सरळ वाहून न जाता कुठेतरी मुरावे, त्यासाठी पाणी अडविण्याची यंत्रणा तयार व्हावी, भूगार्भातील पाण्याची पातळी वाढून जल, जंगल, जमिनीला फायदा व्हावा हा त्यामागचा हेतू आहे. तलावातील व वन बोड्यांतील पाण्याची पातळी वाढण्यास त्यामुळे मदत होणार आहे.
कोका बिट क्रमांक ९० मध्ये जलशिवार योजनेतून २० हेक्टर आर क्षेत्रात समतल चर खोदण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. प्रती ५ हेक्टर क्षेत्रासाठी ५७ हजार रुपायंचे अंदाजपत्रक त्यासाठी मंजूर करण्यात आले. २० हेक्टर क्षेत्रात सुमारे २.२८ लाखांची कामे होणार आहे. दुधारा व सालेहेटी जंगलात सुद्धा प्रत्येकी १० हेक्टर आर क्षेत्रात दोन दिवसात कामाला सुरुवात होणार आहे. असे तिन्ही गावात एकुण ४८ हेक्टर आर क्षेत्रात सुमारे ३.४२ लाख रुपये खर्चून समतल चर काढण्याची कामे वन विभाग कोका यांचे मार्फत पूर्ण करण्याचा मानस अधिकारी स्तरावरून व्यक्त केला जात आहे. (वार्ताहर)

कोका प्रादेशिक वनविभागाच्या जंगलातील वनतलाव व वनबोड्यातील पाण्याची पातळी वाढावी तसेच भूगर्भातील पाण्याचा साठा वाढावा, वन्यप्राणी, वनस्पती, मानव व गुरांना त्याचा उपयोग व्हावा, या हेतूने समतल चरांचे खोदकाम करण्यात आले आहे. या माध्यमातून पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल.
- विपीन डोंगरे,
वनरक्षक वनविभाग कोका

Web Title: Charcoal excavation for ground water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.