शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

चरण वाघमारे यांनी केली पाच व्हीव्हीपॅट मशीन तपासण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 12:20 IST

Bhandara Assembly Vidhan Sabha Election 2024 Live Results Winning Candidate : निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिला नकार

तुमसर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार चरण वाघमारे यांनी मतदानानंतर संध्याकाळी ७.३० वाजताच्या सुमारास तुमसर तहसील कार्यालयातील मतमोजणी केंद्राला भेट देऊन, आपण सुचविलेल्या पाच व्हीव्हीपॅटची आपल्या समक्ष तपासणी करावी, अशी मागणी केली. मात्र त्यांच्या अर्जाला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी लेखी आदेश देऊन स्पष्ट नकार दिला. ही माहिती जाणून घेण्याकरिता माध्यम प्रतिनिधी मतदान केंद्राकडे गेले. मात्र त्यांची प्रतिक्रिया घेण्यापासून पोलिसांनी सर्वांना रोखले.

मतमोजणी सुरू असताना सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास चरण वाघमारे मतमोजणी केंद्रावर पोहचले. आपण सुचवू त्या कोणत्याही पाच व्हीव्हीपॅट मशीनची  आपल्यासमोर तपासणी करावी, असा लेखी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी दर्शन निकाळजे यांना दिला. परंतु यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्ट नकार दिला. वाघमारे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी उत्तराची मागणी केली. अर्ध्या तासानंतर अधिकाऱ्यांनी लेखी उत्तर दिले. 

आपला कायदेशीर अधिकार नाकारला : वाघमारे आपण या मतदार संघातील उमेदवार आहेत. त्यामुळे आक्षेप घेण्याचा आणि अधिकार आपणाला आहे. आपण सुचविलेल्या पाच व्हीव्हीपॅट मशीन आपल्यासमोर तपासणी करण्याच्या आपल्याला कायदेशीर अधिकार आहे. त्यामुळेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना तशी लेखी मागणी केली. परंतु त्यांनी ती मान्य केली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांना हा प्रकार कळविला आहे, असे वाघमारे यांनी 'लोकमत' ला सांगितले.

माध्यम प्रतिनिधींना मज्जाव संध्याकाळी अखेरच्या फेरीचा निकाल घेण्याकरिता माध्यम प्रतिनिधी मतमोजणी केंद्रात जाताना तुमसरचे उपविभागीय पोलिस अधिकारी पांडुरंग गोफणे यांनी सर्वांना मुख्य प्रवेशद्वाराचे रोखले. एकदा बाहेर निघाल्यानंतर दुसऱ्यांदा आत जाता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे शेवटच्या फेरीतील निकालाकरिता माध्यम प्रतिनिधींना भटकावे लागले. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या प्रकाराकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024bhandara-acभंडाराtumsar-acतुमसरVidarbhaविदर्भ