बदल घडतो, घडू शकतो, पहिले सुरुवात करा!

By Admin | Updated: September 14, 2016 00:34 IST2016-09-14T00:34:46+5:302016-09-14T00:34:46+5:30

जागतिक स्पर्धेमध्ये भारत अग्रेसर ठरला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाने देशाला आवाहन करून गंगामातेला स्वच्छ करण्याचा ध्यास घेऊन एका पवित्र कार्याला सुरुवात केली.

Changes happen, it can happen, take the first step! | बदल घडतो, घडू शकतो, पहिले सुरुवात करा!

बदल घडतो, घडू शकतो, पहिले सुरुवात करा!

शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन : काशीवार यांच्या विकासकामांचे कौतुक
संजय साठवणे साकोली
जागतिक स्पर्धेमध्ये भारत अग्रेसर ठरला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाने देशाला आवाहन करून गंगामातेला स्वच्छ करण्याचा ध्यास घेऊन एका पवित्र कार्याला सुरुवात केली. यातूनच विविध संस्थांनी पुढाकार घेऊन स्वयंस्फुर्तीने स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नागपूर येथे रविवारला साकोली मतदारसंघातील आमदार बाळा काशीवार यांच्या विकास कामांचा आढावा पुस्तिकेच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आमदार बाळा काशीवार उपस्थित होते.
आ.बाळा काशीवार यांनी साकोली क्षेत्रात केलेल्या विविध विकासकामाचा आढावा घेणारी पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. यात केंद्र शासनाच्या विविध ५२ योजनांची माहिती आहे. राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार, महिला सक्षमीकरण, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना, कन्यादाान योजना, दलित वस्ती सुधार योजना, महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजना, शुभमंगल सामूहिक विवाह, बीज भांडवल योजना, चर्मकार बांधवांसाठी अनुदान व प्रशिक्षण योजना, गटई स्टॉल योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनांची माहिती या पुस्तिकेत आहे.
याशिवाय आ.बाळा काशीवार यांनी साकोली विधानसभा क्षेत्रात केल्या विकास कामात मतदार स्थानिक विकास निधी अंतर्गत विविध गावात विविध बांधकाम, सीआरएफ अंतर्गत विविध विकास कामे, टसर उद्योगातून स्वयंरोजगार निर्मिती, आमदार स्थानिक विकास निधीतून डिजीटल शाळा तयार करणे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील रिक्त पदे भरणे, ५० पैसेपेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावांमधील आयटीआय करीत असलेल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्क कमी करण्यासाठी प्रयत्न, साकोली नगरपरिषदेचा दर्जा मिळवून देण्याचा निर्णय लाखनी व लाखांदूर तालुक्यासाठी विकास निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न, आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी सार्वजनिक आरोग्यमंत्री, आदिवासी बांधवांना जातीचे दाखले मिळावे, यासाठी आदिवासी मंत्री यांच्याशी चर्चा वनमजुरांना नियमित करण्यासाठी प्रयत्न यासह विकासात्मक कामाचा आढावा व माहिती या पुस्तकात प्रकाशित करण्यात आली आहे.

या पुस्तकाच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली आहे. या योजना लोकापर्यंत पोहचाव्यात यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र यात कुणाला काही अडचणी असल्यास त्यांनी प्रत्यक्ष भेटावे. अडचणी दूर करण्यासाठी कटीबद्ध आहे.
-बाळा काशीवार,
आमदार साकोली

Web Title: Changes happen, it can happen, take the first step!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.