जिल्हा रुग्णालयाची विस्कटलेली घडी बसविण्याचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:36 IST2021-01-23T04:36:13+5:302021-01-23T04:36:13+5:30
आता एकदाचा चाैकशी अहवाल आला, कारवाई झाली. जिल्हा शल्य चिकित्सक पदी अस्थिराेग तज्ज्ञ डाॅ.पीयूष जक्कल यांची नियुक्ती करण्यात आली. ...

जिल्हा रुग्णालयाची विस्कटलेली घडी बसविण्याचे आव्हान
आता एकदाचा चाैकशी अहवाल आला, कारवाई झाली. जिल्हा शल्य चिकित्सक पदी अस्थिराेग तज्ज्ञ डाॅ.पीयूष जक्कल यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी शुक्रवारी तातडीने डाॅ.खंडाते यांच्याकडून पदभार स्वीकारला. आता त्यांच्यापुढे या रुग्णालयाची विस्कटलेली घडी बसविण्याचे माेठे आव्हान आहे. डाॅक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या मनातील भीती दूर करून रुग्णांच्या सेवेत नव्या जाेमाने त्यांना कामाला लावण्याचे आव्हान नवीन जिल्हा शल्य चिकित्सकांपुढे आहे. डाॅ.जक्कल गत आठ वर्षांपासून भंडारा जिल्हा रुग्णालयात कार्यरत आहेत. प्रथमश्रेणी वैद्यकीय अधिकारी असून, त्यांना रुग्णालयाची इत्थंभूत माहिती आहे. त्यामुळेच या रुग्णालयाचा कारभार लवकरच रुळावर येईल, अशी अपेक्षा आहे.
बाॅक्स
फायर आणि स्ट्रक्चरल ऑडिट हाेणार
जिल्हा सामान्य रुग्णालयाचे फायर आणि स्ट्रक्चरल ऑडिट लवकरच हाेणार असून, त्यानंतर येथे असलेल्या त्रुटी दूर करण्यात येतील, तसेच एसएनसीयू कक्ष पुनर्स्थापित करण्याच्या कामाला गती देण्यात येईल, असे नवनियुक्त जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.पीयूष जक्कल यांनी सांगितले. जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांसाठी सर्व सेवा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.