बाजार समितीच्या आमसभेत खुर्च्यांची फेकाफेक
By Admin | Updated: August 12, 2014 23:35 IST2014-08-12T23:35:53+5:302014-08-12T23:35:53+5:30
कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसरची आमसभा दुपारी २ वाजता सुरू होताच सभासदांनी, सभापतींचा विरोधात गोंधळ घातला. आमासभेत काहींचा सत्कार समारंभासाठी ३ तासांचा अवधी लागतात.

बाजार समितीच्या आमसभेत खुर्च्यांची फेकाफेक
तुमसरातील प्रकार : लवकरच गुंडाळली आमसभा
तुमसर : कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसरची आमसभा दुपारी २ वाजता सुरू होताच सभासदांनी, सभापतींचा विरोधात गोंधळ घातला. आमासभेत काहींचा सत्कार समारंभासाठी ३ तासांचा अवधी लागतात. सभासद ओरडल्यामुळे आमसभा गुंडाळण्याचा प्रयत्न अध्यक्षांनी केला. संतापलेल्या सभासदांनी खुर्च्याची फेकाफेक करताच प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी संपूर्ण संचालक मंडळाने अध्यक्षासह आमसभेतून पळ काढला.
तुमसर कृषी उत्पन्न बाजार समिती ही एक नावाजलेली बाजार समिती म्हणून ओळखली जाते. परंतु वर्तमान अध्यक्ष व संचालक मंडळाच्या कार्यप्रणालीमुळे ही बाजार समिती या दोन व्यक्तीवर अवलंबून आहे. आज कृषी उत्पन्न बाजार समितीची दुपारी २ वाजता आमसभा सुरू झाली. आमसभेत सत्कारासाठी अवधी लागल्यामुळे सभासद संतापून, आपला राग खुर्च्या फेकून व्यक्त केला. आमसभेत अध्यस्थानी सभापती भाऊराव तुमसरे यांनी अहवाल वाचताच बसलेल्या सभासदांना पश्नांचा भडीमार करताच सभापती उत्तर देऊ शकले नाही व उस्रे देण्यास उपसभापती राजकुमार माटे उभे होताच सभासद उत्तरे द्यावी, अशी मागणी करतात हळूहळॅ सर्व संचालक मंडळ व्यासपीठ सोडून जाऊ लागले. आमसभेत संचालक मंडळांनी आमसभा गुंडाळण्याला प्रयत्न करत, असताना काही सभासदांनी बाजार समितीत, रोजंदारी कर्मचाऱ्यांना स्थायी कर्मचानी न करता, नव्याने कर्मचारी भरती असा प्रश्न विचारताच सभापती तुमसरे उत्तरे देऊ शकले नाहीत. सभासदांनी आमसभेत विविध प्रश्न उपस्थित करून अध्यक्षांना घेरण्याचा प्रयत्न करताच संचालकांनी पळ काढल्यामुळे आमसभेत एकच गोंधळ उडाला. आमसभेचे अहवाल व निमंत्रण पत्रिका सुद्धा सभासदांना देण्यात आले नसल्याने त्यांच्यात रोष होता. सभापती व संचालक मंडळ आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थीत पार पाडत नसून स्वत:च्या हितासाठी बाजार समिती चालवित असल्याचा आरोप काही सभासदांनी केला. ही बाजारपेठ घोटाळेबाज बाजारपेठ म्हणून ओळखली जात असल्याचा आरोपही उपस्थित सभासदांनी केला. त्यामुळे आमसभा वादग्रस्त ठरली.
(तालुका प्रतिनिधी)