अध्यक्षपदी मोटघरे, उपाध्यक्षपदी ठवकर

By Admin | Updated: July 26, 2014 01:23 IST2014-07-26T01:23:42+5:302014-07-26T01:23:42+5:30

अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर पवनी नगर

Chairmanship of President | अध्यक्षपदी मोटघरे, उपाध्यक्षपदी ठवकर

अध्यक्षपदी मोटघरे, उपाध्यक्षपदी ठवकर

पवनी नगरपालिका निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेसने खेळली खेळी
पवनी :
अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर पवनी नगर पालिकेत आज शुक्रवारला झालेल्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने सेनेच्या रजनी मोटघरे या नगराध्यक्षपदी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ.विजय ठवकर याची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. विशेष म्हणजे पवनी पालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता असताना उपाध्यक्ष राकाँचा निवडून आल्यामुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे.
अडीच वर्षापुर्वी झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पवनी नगर परिषदेवर शिवसेनेने सत्ता मिळविली होती. अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच शिवसेनेमध्ये दुफळी निर्माण झाली. शिवसेनेने १७ पैकी १३ जागा जिंकून एकहाती सत्ता काबीज केली होती. मात्र विकासकामात अडचणी येत असल्यामुळे नगरसेवकांमध्ये धुसपूस सुरू झाली. या नगरसेवकांची नाराजी शिवसेनेच्या नेत्यांना दूर करता आली नाही. त्यामुळे नाराज नगरसेवक मागील वर्षभरापासून महिलांचा सदस्यांचा दबावगट तयार करण्याचा प्रयत्न करीत होते. अडीच वर्षाकरीता नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिलांकरीता झाल्याचे घोषित होताच या गटबाजीने जोर धरला होता.
रजनी मोटघरे यांना नगराध्यक्ष बनविण्याच्या मनस्थितीत पक्षश्रेष्ठी असल्यामुळे सेनेचा दुसरा गट नाराज होता. नाराजीला न जुमानता उपाध्यक्ष नरेश बावनकर यांना हाताशी घेऊन दुसऱ्या गटावर मात करण्याची योजना आखली. परंतु सेनेमधील दोन गट निवडणुकीत उतरले तरी त्यांना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना सोबत घेवून निवडणुकीला सामोरे जाणे गरजेचे होते. चालून आलेली ही संधी भंडारा जिल्हा दुग्ध संघाचे अध्यक्ष विलास काटेखाये यांनी हेरून दोन सदस्य असलेल्या राष्ट्रवादीने पालिकेवर विजय मिळविला.
पवनी नगर परिषदेत १७ सदस्य असून यात १३ सेनेचे, २ काँग्रेसचे, २ काँग्रेस व २ राष्ट्रवादी असे पक्षीय बलाबल आहे. यात मोहन सुरकर गटाकडून नगराध्यक्ष पदाकरीता वनिता काटेखाये तर उपाध्यक्ष पदाकरीता काँग्रेसचे धमेंद्र नंदरधने यांनी तर नरेश बावनकर गटाकडून रजनी मोटघरे यांना नगराध्यक्ष तर डॉ.विजय ठवकर यांनी उपाध्यक्ष पदाकरिता आवेदन भरले होते. ही निवडणूक प्रक्रिया पालिकेच्या सभागृहात हात उंचावून पार पाडण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रविंद्र कुंभारे, सहायक निवडणुक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी रविंद्र भेलावे यांनी काम पाहिले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Chairmanship of President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.