सभापतीपदी तुमसरे, उपसभापतीपदी पटले

By Admin | Updated: September 22, 2016 00:34 IST2016-09-22T00:34:07+5:302016-09-22T00:34:07+5:30

बुधवारी पार पडलेल्या तुमसर- मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीची उपसभापतींची निवडणूक अविरोध झाली.

In the chairmanship of the Chairman, | सभापतीपदी तुमसरे, उपसभापतीपदी पटले

सभापतीपदी तुमसरे, उपसभापतीपदी पटले

निवडणूक बाजार समितीची : बिनविरोध झाली निवड
तुमसर : बुधवारी पार पडलेल्या तुमसर- मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीची उपसभापतींची निवडणूक अविरोध झाली. सभापती पदावर भाऊराव तुमसरे तर उपसभापती अशोक पटले विराजमान झाले. तुमसर येथे बाजार समिती कार्यालयात निवडणूक सोपस्कार पार पडले.
निवडणुकीला सुरुवात दुपारी ३ वाजता झाली. सभापती पदाकरिता बळीराजा जनहीत आघाडीकडून भाऊराव तुमसरे यांनी अर्ज दाखल केला तर शेतकरी आघाडीकडून किरण अतकरी यांनी अर्ज भरला. नंतर अतकरी यांनी अर्ज मागे घेतला.
त्यामुळे बळीराजा जनहीत आघाडीचे भाऊराव तुमसरे यांची अविरोध निवड झाली. उपसभापती पदाकरिता बळीराजा जनहीत आघाडीकडून अशोक पटले यांनी अर्ज दाखल केला. त्यांच्या विरोधात अर्ज नसल्याने त्यांचीही अविरोध निवड झाली.
बळीराजा जनहीत आघाडीचे एकुण १५ संचालक विजयी झाले होते. शेतकरी आघाडीचे तीन तर एक संचालक अपक्ष निवडून आले होते. भाऊराव तुमसरे सलग दुसऱ्यांदा सभापतीपदी विराजमान झाले.
तुमसरे तथा पटले यांची विजयी मिरवणूक शहरातून काढण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणनू प्रदीप भानारकर, सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून हरिअर कुहीकर, अमित सूर्यवंशी यांनी कर्तव्य बजावले.
या निवडणुकीकरिता भाजपचे निरीक्षक म्हणून प्रशांत खोब्रागडे उपस्थित होते. याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी, प्रकाश मालगावे, मुन्ना पुंडे, डॉ.युवराज जमईवार, रमेश पारधी, बंडू बनकर सह बाजार समितीचे संचालक अरविंद कारेमोरे, सुनिल गिरीपुंजे, डॉ.हरेंद्र राहांगडाले, कुसुम कांबळे, चंद्रकला ढेंगे, राजेश पटले, सतीशकुमार चौधरी, हरिहर गोंडाणे, बालकदास ठवकर, अनिल जिभकाटे, सुभाष बोरकर, महादेव पचघरे, गणेशराम बावणे, शेतकरी आघाडीचे रामदयाल पारधी, रामेश्वर कारेमोरे, चंद्रशेखर सेलोकर उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: In the chairmanship of the Chairman,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.