सभापती, बीडीओंचा खासगी वाहनाने प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:18 IST2017-12-07T00:18:15+5:302017-12-07T00:18:30+5:30

साकोली पंंचायत समिती कार्यालयात असलेले चारचाकी वाहन चालकाअभावी धूळ खात पडले आहेत.

Chairman, BDO's private vehicle journey | सभापती, बीडीओंचा खासगी वाहनाने प्रवास

सभापती, बीडीओंचा खासगी वाहनाने प्रवास

ठळक मुद्देपंचायत समितीचे वाहन धूळ खात : साकोली येथील प्रकार

आॅनलाईन लोकमत
साकोली : साकोली पंंचायत समिती कार्यालयात असलेले चारचाकी वाहन चालकाअभावी धूळ खात पडले आहेत. परिणामी सभापती व खंड विकास अधिकाऱ्यांना शासकीय कामासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.
साकोली तालुक्यात ६३ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींचा कारभार व तिथे काही अडचणी उदभवल्यास खंडविकास अधिकारी किंवा सभापती यांना जाण्यासाठी शासनाने वाहन उपलब्ध करून दिले आहे.
मात्र मागील एक वर्षापासून या शासकीय वाहनाला चालविण्यासाठी चालकच नाही. एक वर्षापुर्वी येथील एक चालक सेवानिवृत्त झाल्याने त्याच्या ठिकाणी दुसरा चालक पाठविण्यात आला.
मात्र नव्याने रूजू झालेला चालक मागील काही महिन्यापासून रजेवर असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी जिल्हा परिषदेने दुसरा चालक पाठविलेला नाही. परिणामी वाहनाअभावी खंडविकास अधिकारी व सभापती यांना शासकीय कामासाठी खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाला कळल्यावर सदर प्रकरण चर्चेत आले होते. मात्र त्यावर अजूनपर्यंत तोडगा निघालेला नाही.

यासंदर्भात चालकाची व्यवस्था करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाºयांशी चर्चा केली असता खंडविकास अधिकाºयांना रोजंदारी चालकाची नियुक्ती करून चालक ठेवण्याची सूचना केली. मात्र चालकाची व्यवस्था झालेली नाही. त्यावमुळे वाहन धूळखात आहे.
-नेपाल रंगारी,
जिल्हा परिषद सदस्य, भंडारा

Web Title: Chairman, BDO's private vehicle journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.