शहर स्वच्छतेचा ‘सीजीएस’ मंत्र

By Admin | Updated: January 3, 2015 22:56 IST2015-01-03T22:56:15+5:302015-01-03T22:56:15+5:30

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून नगरपालिका पातळीवरील शहरे स्वच्छ करण्याचा संकल्प विभागीय आयुक्त कार्यालयाने केला आहे. त्यासाठी नवीन वर्षात

The 'CGS' mantra of cleanliness of the city | शहर स्वच्छतेचा ‘सीजीएस’ मंत्र

शहर स्वच्छतेचा ‘सीजीएस’ मंत्र

भंडारा : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून नगरपालिका पातळीवरील शहरे स्वच्छ करण्याचा संकल्प विभागीय आयुक्त कार्यालयाने केला आहे. त्यासाठी नवीन वर्षात ‘स्वच्छ शहर - सुंदर शहर - हिरवे शहर’ ‘सीजीएस ’ (क्लीन ग्रीन सिटी) ही संकल्पना राबविण्यावर भर दिला जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ आॅक्टोबरपासून स्वच्छ भारत अभियान देशपातळीवर राबविण्याचे आवाहन केले. त्याला राज्यातही विविध स्वंयसेवी संस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. देशाचा पंतप्रधान हातात झाडून घेऊन स्वच्छतेबद्दल सांगतो याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यापासून प्रेरणा घेऊन नगरपंचायत आणि नगरपालिका पातळीवरील शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी आयुक्त कार्यालयाने नवीन वर्षात काही उपक्र म हाती घेण्याचा विचार केला असून त्यात ‘सीजीएस’ या संकल्पनेचा समावेश राहणार आहे.
छोट्या नगर पंचायती आणि नगरपालिकांच्या ठिकाणी शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा, दवाखाने आणि इतरही सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांकडून स्वच्छतेचे प्रमाणपत्र दिले जाईल व ते ठळकपणे संबंधित ठिकाणी लावले जातील. त्यापासून इतरांना प्रेरणा मिळावी, हा या मागचा उद्देश असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे शहर स्वच्छ, हिरवे आणि सुरिक्षत ठेवणाऱ्या नगरपालिका, नगरपंचायतींचा गौरव करण्यात येणार आहे.
नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातील विविध नगरपालिका, शहरातील सरासरी सहा हजारांवर नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने स्वच्छता अभियानात सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्याचा फायदा या उपक्र माला होण्याची शक्यता आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The 'CGS' mantra of cleanliness of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.