नाबार्डच्या निकषात बसणारी भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँक

By Admin | Updated: October 16, 2016 00:32 IST2016-10-16T00:32:18+5:302016-10-16T00:32:18+5:30

आरबीआय आणि नाबार्डने राज्यातील जिल्हा सहकारी बँकांना ठरवून दिलेल्या मापदंडानुसार...

The Central Bank of Bhandara, which is sitting in the NABARD quota | नाबार्डच्या निकषात बसणारी भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँक

नाबार्डच्या निकषात बसणारी भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँक

भंडारा : आरबीआय आणि नाबार्डने राज्यातील जिल्हा सहकारी बँकांना ठरवून दिलेल्या मापदंडानुसार ज्या बँकांचा कारभार सुरळीत निकषपूर्ण नियमाप्रमाणे चालू आहे. अशा निकषपूर्ण कारभार करणाऱ्या बँकांमध्ये राज्य सहकारी बँकसह केवळ १० बँकांनी कारभार चालवून बँकांसह नाबार्डला उदयास आणले. त्यात भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मोठा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे आरबीआय आणि नाबार्डने राज्यातील १० बँकांना चांगले कार्य केल्याने जणू त्यांची पाठच थोपटली. पण राज्यातील १० बँकांवर ठपका ठेवला.
जिल्हा सहकारी बँकांच्या कारभारावर देखरेख ठेवण्यासाठी नाबार्डने एक समिती गठीत केली असून ही समिती वर्षातून एकदा या बँकांच्या कामकाजाची तपासणी करते. त्यातून बँकेच्या कामकाजातील त्रुट्या काढून बँकेचा दर्जा ठरविला जातो.
नाबार्ड अहवालाच्या आधारेच रिझर्व बँक आपली भूमिका वाढविते. नाबार्ड समितीने काही महिन्यांपूर्वीच राज्यातील जिल्हा सहकारी बँकांच्या कामकाजाची तपासणी केली होती. त्यात नाबार्डच्या व आरबीआयच्या ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे व नियमाप्रमाणे राज्यातील २१ जिल्हा सहकारी बँकांपैकी १० बँकांना उत्कृष्ट बँका म्हणून जणू प्रमाणपत्रच दिले.
त्यात काही करून भंडारा जिल्हा सहकारी बँकेचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. त्यासह ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा, रायगड, रत्नागिरी, पुणे, लातूर गडचिरोली आणि अकोला या बँकांचा समावेश करण्यात आला आहे.
नाबार्डने असेही म्हटले आहे की, ज्या बँकांच्या कारभारात त्रुटी आढळून आल्या आहेत त्यांनी कारभारात त्वरीत सुधारणा करावी, असे निर्देशही नाबार्डने एका पत्राद्वारे दिले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: The Central Bank of Bhandara, which is sitting in the NABARD quota

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.