‘खवा’ बनविण्याचे कोंढा बनले केंद्र
By Admin | Updated: November 16, 2014 22:44 IST2014-11-16T22:44:39+5:302014-11-16T22:44:39+5:30
कोंढा व कोसरा येथे खवा निर्मितीसाठी अनेकांनी मोठ्या प्रमाणात भट्या लावल्या आहेत. दुधापासून खवा, मिठाई, मनीर बनवून येथून विकले जात आहे. यासाठी काहींनी अन्न व औषधी

‘खवा’ बनविण्याचे कोंढा बनले केंद्र
कारवाईची गरज : खासगी डेअरीतून दुधाची खरेदी
कोंढा कोसरा : कोंढा व कोसरा येथे खवा निर्मितीसाठी अनेकांनी मोठ्या प्रमाणात भट्या लावल्या आहेत. दुधापासून खवा, मिठाई, मनीर बनवून येथून विकले जात आहे. यासाठी काहींनी अन्न व औषधी प्रशासनाची मान्यता घेतली तर काहींनी विनापरवाना दुकानदारी थाटली आहे.
कोंढा परिसरात सध्या सर्वसामान्यपणे खवा निर्माण करण्याचे प्रकार वाढले आहेत. या कामात अनेक लोक गुंतले आहेत. परिसरात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याने काही परप्रांतीय लोकांनी येथे दुधापासून खवा निर्माण करण्याच्या भट्या लावल्या आहेत. याशिवाय दुधापासून पनीर, मिठाई बनवून बोऱ्यामध्ये भरून दुसऱ्या जिल्ह्यात पाठविले जात आहे. यासाठी खासगी एस.टी. वाहनाचा वापर केला जात आहे.कोंढा येथे प्रसिद्ध म्हैस बाजार आहे. येथे गाय, म्हैस यांची खरेदी विक्री होत असल्यामुळे पशुपालकांची संख्या परिसरात मोठी आहे. त्यामुळे खासगी कंपन्यांनी कोंढा व परिसरात दूध खरेदी केंद्र सुरु केले आहे. दुधात अस्वच्छ पाणी मिसळविले जाते. तसेच फॅट वाढविण्यासाठी अनेक पदार्थांचे मिश्रण केले जात आहे. संघाच्या डेअरी केंद्रावर फॅट व दुधाची भेसळ तपासली जात असल्याने दुग्ध उत्पादक खासगी दुग्ध संकलन केंद्रावर दूध विकतात. याचा फायदा खवा उत्पादन करणारे खासगी डेअरीचे दूध खरेदी करून खवा, पनीर, मिठाई बनवितात.
दुधात भेसळ करून हा प्रकार सुरु असताना अन्न व औषधी प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. दूध, दही, फळ, भाजीपाला हे सर्वसामान्याच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असल्याने हे पदार्थ भेसळमुक्त असावयास पाहिजे. परंतु जास्त पैशाच्या मोहामुळे भेसळकरून पदार्थ विकत असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे सर्वसामान्याच्या आजारात वाढ झाली आहे.
दूधापासून खवा, मिठाई, पनीर बनविले जाते. अनेकांकडे याचा परवाना देखील नाही. खवा बनविण्यासाठी घरी एक भट्टी लावली जाते. भट्टीचे धूर आजूबाजूच्या घरात जाते. त्यामुळे तेथील अनेकांच्या घरात शिरत असल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. भट्टी सुरु करण्यासाठी ग्राम पंचायत कार्यालयाची परवानगी असणे आवश्यक आहे. पण ती परवानगी देखील घेतली नसल्याचे निदर्शनात आले आहे. (वार्ताहर)