आनंदोत्सवाचा सण दिवाळी आली हो...!

By Admin | Updated: November 8, 2015 00:47 IST2015-11-08T00:47:56+5:302015-11-08T00:47:56+5:30

हिंदू संस्कृतीमधील महत्वाचा दिवाळीचा सण लखलखत्या दिव्यांच्या मंद प्रकाशात साजरा करण्याची परंपरा अविरत सुरू आहे.

The celebration of the celebration of Diwali has come ...! | आनंदोत्सवाचा सण दिवाळी आली हो...!

आनंदोत्सवाचा सण दिवाळी आली हो...!

संस्कृतीचे पालन : धार्मिक व ऐतिहासिक परंपरा कायम
बाराभाटी: हिंदू संस्कृतीमधील महत्वाचा दिवाळीचा सण लखलखत्या दिव्यांच्या मंद प्रकाशात साजरा करण्याची परंपरा अविरत सुरू आहे. ग्रामीण भागात यावर्षी शेतकऱ्यांच्या हाती पैसा नसला तरी धार्मिक परंपरा तेवढ्याच उत्साहाने जपली जात आहे.
दिवाळीच्या या पाच दिवसाच्या सणाची हिंदू शास्त्राप्रमाणे अनेक आख्यायीका आहेत. दिवाळीचा पहिला दिवस हा धनत्रयोदशी. धन्वंतरी जयंती म्हणून वैद्य मंडळी या दिवशी पूजन करून कडूलिंबाची पाणे बारिक करून साखरेसोबत प्रसाद म्हणून लोकांना देतात. दिवाळीचा दुसरा दिवस नरक चतुदर्शीचा या दिवशी तेलाचे दर्मन शरिरास करुन या सणाशी नरकासुरवध आध्यायिका प्रचलित आहे. नरकासुराने तप करुन ब्रम्हदेवाला प्रसन्न केले. अनेक राज्यांच्या कन्या नरकसुर याने पळविल्या होत्या. कृष्णाने नरकासुराच्या बंदिवासातील त्या कुमारिकांना सोडवून त्यांच्याशी विवाह करून सामाजिक प्रतिष्ठा मिळविली म्हणून नरक चतुर्दशी साजरी करतात.
तिसरा दिवस लक्ष्मीपूजन आहे. या दिवशी लक्ष्मीची स्थापना केली जाते. या दिवशी लक्ष्मी रात्री सर्वत्र संचार करुन निवासासाठी स्थान शोधते असे म्हटले जाते. दिवाळीचा चौथा दिवस बलिप्रतिपदा होय. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुर्हूत आहे. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षवण करते व पती पत्नीला ओवाळणी घालतो. नवनिवाहित दाम्पत्याची पहिली बलीप्रतिपदा पत्नीच्या माहेरी साजरी करतात यालाच दिवाळी सण म्हणतात.
दिवाळीचा पाचवा दिवस भाऊबीज. भाऊबीजेच्या कोरीप्रमाणे बंधूप्रेमाचे वर्धन होत राहो ही भूमिका आहे. असा भाऊबीजेचा सन समाजात भगिणींच्या राष्ट्रातील संरक्षणाची जबाबदारी स्विकारतात म्हणून ओळखला जातो. असा पाच दिवसांचा दिवाळीचा सण अनेक सामान खरेदी करणे, फटाके, नवे वस्त्र, रंगरंगोटी, रांगोळीची रचना अंगणात सुशोभीत केली जाते. घरांची स्वच्छता अशाप्रकारे सर्वच कामे दिवाळी निमित्ताने करुन दिवाळीचा सण मोठ्या आनंदाने परिवारासह शहरापासून तर खेड्यांमध्ये सुद्धा साजरा केला जातो. (वार्ताहर)

Web Title: The celebration of the celebration of Diwali has come ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.