‘पशुधनां’नी वाढविली पशुपक्षी मेळाव्याची शोभा

By Admin | Updated: January 10, 2015 22:48 IST2015-01-10T22:48:18+5:302015-01-10T22:48:18+5:30

मेळावा म्हटले की, डोळ्यासमोर उभे राहते उपवर-वधु. तालुक्यातील मानेगाव (बाजार) येथे शुक्रवारी मेळावा भरला. मात्र, या मेळाव्यात उपवर-वधुंची नव्हे तर पशुधनांची हजेरी लक्षवेधी ठरली. औचित्य होते,

The celebration of 'animal husbandry' | ‘पशुधनां’नी वाढविली पशुपक्षी मेळाव्याची शोभा

‘पशुधनां’नी वाढविली पशुपक्षी मेळाव्याची शोभा

भंडारा : मेळावा म्हटले की, डोळ्यासमोर उभे राहते उपवर-वधु. तालुक्यातील मानेगाव (बाजार) येथे शुक्रवारी मेळावा भरला. मात्र, या मेळाव्यात उपवर-वधुंची नव्हे तर पशुधनांची हजेरी लक्षवेधी ठरली. औचित्य होते, तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनीचे. प्रदर्शनीनिमित्त परिसरातील गावांमधील पशुपालकांच्या पाल्यांनी सादर केलेली गाणी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला, हे विशेष.
दिवाळीतील तुळशी विवाहानंतर विवाहयोग्य उपवर - वधुंची शोध मोहिम सुरू होते. काही समाजात उपवर वधु परिचय मेळावा, आयोजित करण्यात येऊन त्यातून भावी जोडींची निवड प्रक्रीया पार पाडली जाते. असाच प्रयोग आता शासनाच्यावतीने सुरू करण्यात आल्याचा प्रत्यय शुक्रवारी मानेगाव येथे पार पडलेल्या पशुपक्षी प्रदर्शनीदरम्यान दिसून आला. पशुवद्यकीय अधिकारी गुणवंत भडके यांच्या कल्पनेतून ही प्रदर्शनी आयोजित केली होती. या प्रदर्शनीत पशुपालकांनी पशुधनासह पाळीव शेळ्या, मेंढ्या व कोंबडे आणले होते. मेळाव्यासमान असलेल्या पशुपक्षी प्रदर्शनीत असलेल्या गायी, म्हशी व बैलांनाही पशुपालकांनी सजवून आणले होते. पोळ्याच्या सणाला पशुपालक पशुधनाला साज चढवितात, त्याच पध्दतीने प्रदर्शनीसाठी सजवून आणले होते. त्यामुळे पशुपक्षी प्रदर्शनी पशु व पशुपालकांसाठी खास पर्वणी ठरली. प्रदर्शनीत ६ लिटर ते २० लिटर पर्यंत दुध देणाऱ्या विविध प्रजातिच्या गायी आणण्यात आल्या होत्या. सोबतच ४ ते ५ किलो वजनाचा कोंबळा नागरिकांना आकर्षित करीत होता. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The celebration of 'animal husbandry'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.