स्वेच्छा रक्तदानाने बाबुजींची जयंती साजरी
By Admin | Updated: July 2, 2014 23:13 IST2014-07-02T23:13:07+5:302014-07-02T23:13:07+5:30
‘लोकमत’चे संस्थापक संपादक ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व.जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या जयंतीनिमित्त स्थानिक शालवन कोचिंग क्लासेस येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

स्वेच्छा रक्तदानाने बाबुजींची जयंती साजरी
भंडारा : ‘लोकमत’चे संस्थापक संपादक ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व.जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या जयंतीनिमित्त स्थानिक शालवन कोचिंग क्लासेस येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात १३ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले.
कार्यक्रमाची सुरुवात बाबुजींच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. उद्घाटन रतन वंजारी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा प्रतिनिधी नंदू परसावार, कार्यालय प्रमुख मोहन धवड, लाईफ लाईन रक्तपेढीचे रवी गजभिये, शालवन कोचिंग क्लासेसचे कर्मचारी आणि लोकमत कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी लाईफ लाईन रक्तपेढीचे रवी गजभिये म्हणाले, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. प्रत्येकांनी रक्तदान केले पाहिजे. रक्तामुळे एखाद्याचा जीव वाचत असेल तर ते पुण्य सर्वात मोठे असते. यावेळी रतन वंजारी हे पहिले रक्तदान करणारे होते. त्यांच्याच हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
या शिबिरात रतन वंजारी, मनोज हिरकणे, दिलीप लापसे, नेहा वरकडे, प्रशांत भोले, हेमंत खोत, मयुर बोटकवार, मोहन बोटकवार, कमलाकर साठवणे, राकेश मेश्राम, हेमराज साकुरे, शुभम अंजनकर, प्राचीन कुकडकर यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. या शिबिरासाठी पराग बंधाटे, कार्यक्रम संयोजक ललीत घाटबांधे, युवा नेक्सट संयोजिका ग्रीष्मा खोत, सखी मंच संयोजिका सीमा नंदनवार, लतीशा खोत, रमेश सेलोकर यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)