बंधने झुगारुन साजरा झाला ‘व्हॅलेंटाईन डे’

By Admin | Updated: February 15, 2015 00:36 IST2015-02-15T00:36:29+5:302015-02-15T00:36:29+5:30

भंडारा शहर प्रतिनिधी : प्रेम हे अडीच शब्दाचे वाक्य. म्हणायला अवघड नसले तरी ते व्यक्त करताना अनेकांची भंबेरी उडते. प्रेम हे आंधळे असते. प्रेमाला उपमा नाही.

Celebrates 'Valentine's Day' | बंधने झुगारुन साजरा झाला ‘व्हॅलेंटाईन डे’

बंधने झुगारुन साजरा झाला ‘व्हॅलेंटाईन डे’

भंडारा : भंडारा शहर प्रतिनिधी : प्रेम हे अडीच शब्दाचे वाक्य. म्हणायला अवघड नसले तरी ते व्यक्त करताना अनेकांची भंबेरी उडते. प्रेम हे आंधळे असते. प्रेमाला उपमा नाही. महाविद्यालयीन युवक-युवतींसोबतच विवाहितांचे गुलाबी प्रेमप्रकरण समोर येत आहेत. अशा प्रेमविरांच्या पर्वणीचा दिवस म्हणजे 'व्हॅलेंटाईन डे'. शनिवारी प्रेमविरांनी सर्व बंधने तोडून हर्षोल्हासात साजरा केला.
व्हॅलेंटाईन डेसारख्या पाश्चात्य संस्कृतीमुळे भारतीय संस्कृती धोक्यात आली आहे. भारतीय संस्कृतीला जगात मोठे मानाचे स्थान आहे. येथील संस्कृती शिकायला जगातील युवक-युवती भारतात येतात. मात्र, या संस्कृतीला पाश्चात्य संस्कृतीमुळे आता धोका निर्माण झाला आहे. महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी तर व्हॅलेंटाईन डे मोठ्या पर्वणीचा दिवस असतो. या दिवसाची हा युवावर्ग मोठ्या उत्सुकतेने वाट बघत असतात. आज युवावर्गाने गुलाबाचे फुल देऊन प्रेम व्यक्त केले. यामुळे बाजारात गुलाबाच्या फुलाचे भावही वधारलेले होते. अनेक युवक-युवती नानाविध कारणे सांगून घराबाहेर पडलेत. महाविद्यालय किंवा नियोजित ठिकाण गाठून प्रियकर किंवा प्रेयशीसोबत ते निवांत ठिकाणी जाऊन दिवस घालविला. शनिवार असल्याने व्हॅलेंटाईन दिन अविस्मरणीय व्हावा, यासाठी अनेक युगुलांनी कोरंभी, रावणवाडी अशा पर्यटनस्थळी घालविला. तर काहींनी देवदर्शन घेऊन पुढील वाटचालीसाठी देवाला साकडे घातले. (शहर प्रतिनिधी)
व्हॅलेंटाईन डे, रोमच्या एका पुजारीच्या नावावर मनविण्यात येतो. इसवी सन २६९ मध्ये ते शहीद झाले आणि १४ फेब्रुवारी २६९ ला फ्लेमिनियात दफन केले. त्यांच्या थोरवीमुळे त्यांची आठवण सदोदित रहावी यासाठी हा दिवस सर्वत्र साजरा करण्यात येतो. भारतात १९९२ पासून व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात येत आहे. पाश्चिमात्य संस्कृतिमुळे भारतीय संस्कृतीला धोका पोहचत आहे. देशातील अनेक थोर महात्म्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन देशाला स्वातंत्र्य करून दिले. त्यांचे स्मरण रहावे, यासाठी जयंती व पुण्यतिथी सारखे कार्यक्रमा ऐवजी आता व्हॅलेंटाईनला महत्व प्राप्त होत असल्याने हिंदूत्ववादी संघटनांनी याला विरोध केला आहे.
व्हॅलेंटाईन डे ही पाश्चिमात्य संस्कृती असल्याने भारतीय संस्कृतीला धोका निर्माण होत असल्याचा आव हिंदूत्ववादी संघटनांनी आणला. देशभरात या विरोध होत असताना भंडारा शहरात मात्र याचा अपवाद दिसून आला.

Web Title: Celebrates 'Valentine's Day'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.