जिल्ह्यात कृषी दिन उत्साहात साजरा
By Admin | Updated: July 4, 2015 01:30 IST2015-07-04T01:30:52+5:302015-07-04T01:30:52+5:30
हरित क्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या स्मृतीदिनानिमित्त कृषी दिन साजरा करण्यात आला.

जिल्ह्यात कृषी दिन उत्साहात साजरा
वृक्षारोपण : कृषी विभागाने केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन
भंडारा : हरित क्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या स्मृतीदिनानिमित्त कृषी दिन साजरा करण्यात आला. शासनाच्या निर्देशानुसार कृषी विभागाने वृक्षारोपन केले. तथा शेतकऱ्यांना शेतीविषयक योग्य मार्गदर्शन केले.
ग्रामपंचायत रेंगेपार
लाखनी : ग्रामपंचायत रेंगेपार (कोहळी) येथे कृषीदिन हरित क्रांतीचे प्रणेते मुख्यमंत्री स्व. वसंतरावजी नाईक स्मृतीदिन व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ स्थापना दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने ग्रामपंचायत येथील प्रांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी प्राध्यापक भूपेश बावनकुळे, नितीन रामटेके, सरपंच मिरा बोरकर, सुनिल बोरकर व सेवक वाघाये पाटील महाविद्यालय केसलवाडाचे विद्यार्थी सचिन बावनकुळे, अतुल नाकाडे, पुरुषोत्तम जगनाडे, गौरव उमक, मुकुंद हत्तीमारे व सुरज भांडारकर उपस्थित होते.
वाघाये कृषी महाविद्यालय
लाखनी : सेवक वाघाये पाटील कृषी महाविद्यालय केसलवाडा (वाघ) व ग्रामपंचायत पिंपळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिन साजरा करण्यात आला. यावेळी कृषी सहायक योगेश मोहतूरे उपस्थित होते. महाविद्यालयीन विद्यार्थी प्रीती गोंदाळे, चेतना पटले, ज्ञानेश्वरी येनोळकर, कांचन लुटे, विद्याशील मेश्राम, अंजुषा टेंभरे, शुभांगी वरकळे, मोनाली शहारे यांनी सहकार्य केले.
कृषी कार्यालय, तुमसर
तुमसर : तालुका कृषी अधिकारी तुमसर व कृषी विभाग पंचायत समिती तुमसर यांचे संयुक्त विद्यमाने पंचायत समिती तुमसर येथे कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला खंडविकास अधिकारी हिरुडकर, तालुका कृषी अधिकारी आर. बी. नायगावकर, एस. जी. उईके, कृषी पर्यवेक्षक बी. बी. चौधरी, बीटीएम परीसे, प्रगतीशील शेतकरी बिहारीलाल पटले, नानाजी ठाकरे, कृषीतज्ज्ञ चेतन काटेखाये, धनराज रहांगडाले यांनी मार्गदर्शन केले. मेहेर यांनी बीज प्रक्रीया व कृषी केंद्रातुन बियाणे, खते विकत घेताना शेतकऱ्यांनी काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक आर. बी. नायगावकर, के. बी. वाघाडे यांनी केले. (लोकमत चमू)