होळी, धुलीवंदन व रंगपंचमी साधेपणाने साजरी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:37 IST2021-03-27T04:37:10+5:302021-03-27T04:37:10+5:30
२९ मार्च रोजी धुलीवंदन व २ एप्रिल रोजी रंगपंचमी हे सण साजरे करण्यात येणार आहेत. दरवर्षी या सणानिमित्ताने एकमेंकांवर ...

होळी, धुलीवंदन व रंगपंचमी साधेपणाने साजरी करा
२९ मार्च रोजी धुलीवंदन व २ एप्रिल रोजी रंगपंचमी हे सण साजरे करण्यात येणार आहेत. दरवर्षी या सणानिमित्ताने एकमेंकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करण्यात येत असते. परंतु कोविड-१९ चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी धुलीवंदन व रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत. होळी-शिमगा निमित्ताने खास करुन पालखीची मिरवणूक काढण्यात येते. परंतु यावर्षी पालखी घरोघरी न नेता मंदिरातच दर्शनाची व्यवस्था होईल याकरीता स्थानिक प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. तसेच त्याठीकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सोशल डिस्टन्सींगचे तंतोतंत पालन होईल याकडे सर्वतोपरी लक्ष देऊन योग्य ती दक्षता घेण्यात यावी.
सदर आदेशाचे पालन न करणारी अथवा उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह यांनी साथरोग प्रतिबंध कायदा १८९७, आपत्ती व्यवसथापन अधिनियम २००५ तसेच भारतीय दंड संहिता १८६०नुसार अपराध केला असे मानन्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल. असे आपत्ती व्यवस्थापन विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात नमुद केले आहे.