बाबासाहेबांच्या विचारांची जयंती साजरी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2016 00:31 IST2016-04-25T00:31:40+5:302016-04-25T00:31:40+5:30

देशातील संपूर्ण गावात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जयंती साजरी करण्याचे आवाहन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.

Celebrate the birth anniversary of Babasaheb | बाबासाहेबांच्या विचारांची जयंती साजरी करा

बाबासाहेबांच्या विचारांची जयंती साजरी करा

राजकुमार बडोले यांचे आवाहन : शतकोत्तर रजत जयंती वर्षोत्सव
भंडारा : देशातील संपूर्ण गावात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जयंती साजरी करण्याचे आवाहन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रजत जयंती महोत्सवानिमित्त जयंती उत्सव समिती जांबच्या वतीने आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार चरण वाघमारे, पंचायत समिती सभापती बंधाटे, उपसभापती गोबाड, जिल्हा परिषद सदस्य चंदू पिलारे, राणाताई ढेंगे, संदीप ताले, पंचायत समिती सदस्य पाटील, भोंडे, भैरम, जयप्रकाश दुर्गे, विशेष अतिथी तथा सत्कारमूर्ती व उद्योजक मोरेश्वर उके, बाजार समितीचे उपसभापती भाऊराव तुमसरे, नलिनी कोरडे, इंजि प्रभाकर भोयर, विश्वनाथ कुकडे, बाबू ठवकर, अंकुश समरीत, करुणा उके, जगदीश उके, एकनाथ लांजेवार, परमेश नलगोपुलवार आदी उपस्थित होते.
ना.बडोले म्हणाले, देशातील समस्त घटकांसाठी बाबासाहेबांनी आपल्या रक्ताचे पाणी व जीवाचे रान करून स्वतंत्र भारताला जगात सर्वोत्तम ठरलेली भारतीय राज्यघटना सोपवून देशातील तमाम जनतेवर फार मोठे उपकार केले. त्यांच्या उपकाराची परतफेड करण्याची आता खरी वेळ आली आहे. आपण सर्वांनी जाती, धर्म, पंथात गुरफटून न राहता सामाजिक, समतेने एक राहून आपले आणि समाजाचे आर्थिक हित जोपासावे असे आवाहन केले. देशाचे प्रधानमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्या नेतृत्त्वात राज्याचे सामाजिक न्यायमंत्री म्हणून काम करताना आनंद वाटतो. याप्रसंगी जयंती समितीच्या वतीने ना.राजकुमार बडोले, आ.चरण वाघमारे, मोरेश्वर उके, भाऊराव तुमसरे यांचा शाल आणि स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आ.चरण वाघमारे म्हणाले, माझ्या निर्वाचन क्षेत्रातील विकास कामे मी प्राधान्याने सोडवेन. जांब येथे दिलीप उके व रामटेके यांनी बुद्ध विहार बांधकामासाठी दान दिलेल्या जागेवर बांधकामासाठी निधी लवकरच देणार आहे. प्रास्ताविक जगदीश उके यांनी केले. संचालन रवी खोब्रागडे तर आभार प्रदर्शन अशोक डोंगरे यांनी केले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Celebrate the birth anniversary of Babasaheb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.