रक्तदान करून आंबेडकर जयंती साजरी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:35 IST2021-04-08T04:35:36+5:302021-04-08T04:35:36+5:30
भंडारा : राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. भंडारा जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. शासन आपल्या ...

रक्तदान करून आंबेडकर जयंती साजरी करा
भंडारा : राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. भंडारा जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. शासन आपल्या स्तरावर उपाययोजना करीत आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्याने रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यासाठी येत्या १४ एप्रिलला डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान करण्याचे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई यांनी केले.
भंडारा जिल्ह्यात भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गावागावांत मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनीही आपल्या तहसील, शहर व ग्रामस्तरावर डाॅ. आंबेडकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करावे. अधिकाधिक रक्तदान करून महामानवाला अभिवादन करावे असे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. प्रत्येक तालुक्यात, शहरात आणि गावात कोविड लसीकरण आणि चाचणीचे शिबिर लावले आहेत. शासन आपल्या परीने शक्य ती मदत करीत आहे. परंतु, नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत संभ्रम आहे. तो संभ्रम दूर करून जनतेला लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांनी केले.