‘चार्जर’ व ‘राही’ वाघांच्या मृत्यूची कारणे अद्यापही गुलदस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 06:00 IST2019-12-30T06:00:00+5:302019-12-30T06:00:27+5:30

३० डिसेंबर २०१८ ची सकाळ उगवली ती येथील पर्यटनाला व वन्यजीवाला हादरा देणारी. उमरेड पवनी-करांडला अभयारण्याच्या पवनीच्या जंगलातील पवनी-खापरी मार्गाजवळ चिचगाव वनकुप क्र. २२६ मध्ये टी-१६ ज्याला ‘चार्जर’ उर्फ ‘राजा’ नावाने ओळखले जात होते तो नर वाघ मृतावस्थेत मिळाला होता. हा चार्जर वाघ येथील प्रसिध्द वाघ व आशियाचा ऑयकॉन ठरलेल्या जयचा व येथील प्रसिध्द वाघीन राही चा बछडा होता.

The cause of the death of the 'Charger' and 'Rahi' tigers is still in the bouquet | ‘चार्जर’ व ‘राही’ वाघांच्या मृत्यूची कारणे अद्यापही गुलदस्त्यात

‘चार्जर’ व ‘राही’ वाघांच्या मृत्यूची कारणे अद्यापही गुलदस्त्यात

ठळक मुद्देजबाबदारी निश्चित व्हावी : लोटला वर्षभराचा कालावधी

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : डिसेंबर २०१८ मध्ये शेवटचे दोन दिवस वन्यजीव प्रेमी व पर्यटन पे्रमीनी फारच दु:खदायक ठरली होती. उमरेड, पवनी, कºहांडला अभयारण्याच्या पवनीच्या जंगलात येथील प्रसिध्द वाघ ‘चार्जर’ उर्फ ‘राजा’ व प्रसिध्द वाघीन राही संशयास्पद मृतावस्थेत आढळले होते. या घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहेत. या वाघांच्या मृत्यूची जबाबदारी निश्चीत होण्याची गरज आहे. एका मागून एक प्रसिद्ध वाघ येथील जंगलातून नाहीसे होत असल्यामुळे पर्यटनावर याचा मोठा परिणाम झाला आहे.
३० डिसेंबर २०१८ ची सकाळ उगवली ती येथील पर्यटनाला व वन्यजीवाला हादरा देणारी. उमरेड पवनी-करांडला अभयारण्याच्या पवनीच्या जंगलातील पवनी-खापरी मार्गाजवळ चिचगाव वनकुप क्र. २२६ मध्ये टी-१६ ज्याला ‘चार्जर’ उर्फ ‘राजा’ नावाने ओळखले जात होते तो नर वाघ मृतावस्थेत मिळाला होता. हा चार्जर वाघ येथील प्रसिध्द वाघ व आशियाचा ऑयकॉन ठरलेल्या जयचा व येथील प्रसिध्द वाघीन राही चा बछडा होता. तो जवळपास सात वर्षाचा होता. चार्जर हा वाघ पर्यटकांचा आवडता होता.
दुसऱ्याच दिवशी या घटना स्थळाच्या काही अंतरावर येथील प्रसिध्द वाघीन टी ४ ला ‘राही’ नावाने ओळखले जाते तीही संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळली. अर्धवट खालेला रानडुक्कर ही मृतावस्थेत मिळाला होता. व्याघ्र प्रकल्पाने वाघांच्या मृत्यूची चौकशी करुन रानडुकराचे मांस खाल्याने वाघाचा मृत्यू झाला होता असा निष्कर्ष काढला. हा रानडुक्कर कश्याप्रकारे विषयुक्त कसा, याला जबाबदार कोण, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

चौकशीनंतर लगेच फाईल बंद
रानडुक्कराने कुठून विष खाल्ले याविषयी चौकशी करण्याची गरज होती. वनविभागाने चौकशी करुन बंद केले. पुर्ण भारतात प्रसिध्द असलेले येथील वाघ जय, जयचंद, श्रीनिवास चार्जर, राही एका मागून एक नाहीसे झाले. त्यामुळे येथील पर्यटन क्षेत्रावर अवकळा आली आहे. पर्यटकांनी येथील अभयारण्याला पाठ दाखविली आहे. त्यामुळे वनविभागाने येथील वाघांची संख्या वाढवून येथील पर्यटनाला चालना मिळेल यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

Web Title: The cause of the death of the 'Charger' and 'Rahi' tigers is still in the bouquet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ