कत्तलखान्याकडे जाणाऱ्या वाहनाला पकडले

By Admin | Updated: August 10, 2015 00:17 IST2015-08-10T00:17:14+5:302015-08-10T00:17:14+5:30

सिहोरा आठवडी बाजारातून कामठी येथे कत्तलखान्याकडे जाणाऱ्या एका चारचाकी वाहनाला बजरंग दल पदाधिकाऱ्यांनी पाठलाग करुन तुमसर शहरात ...

Catch the vehicle going to the slaughterhouse | कत्तलखान्याकडे जाणाऱ्या वाहनाला पकडले

कत्तलखान्याकडे जाणाऱ्या वाहनाला पकडले

बजरंग दल पदाधिकाऱ्यांनी केला पाठलाग : वाहनचालकालाअटक, गोहत्या बंदीवर प्रश्नचिन्ह!
तुमसर : सिहोरा आठवडी बाजारातून कामठी येथे कत्तलखान्याकडे जाणाऱ्या एका चारचाकी वाहनाला बजरंग दल पदाधिकाऱ्यांनी पाठलाग करुन तुमसर शहरात शनिवारी रात्री ८.३० वाजता पकडले. वाहन चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. नऊ गार्इंना लाखनी (रेंगेपार) येथील गोशाळेत रवाना करण्यात आली आहे. जनावरांच्या मांस विक्रीवर राज्य शासनाने बंदी आणली, पंरतु सर्रास गार्इंची रवानगी कत्तलखान्याकडे नेणे सुरु आहे.
सिहोरा येथे शनिवारी आठवडी बाजार भरतो. या बाजारात बैलबाजारही असतो. मध्य प्रदेशातील अनेक गावातील गुरु येथे खरेदी विक्रीस येतात. भंडारा जिल्ह्यातील जनावरे येथे खरेदी-विकीस आणली जातात. शनिवारी तुमसर तथा सिहोरा येथील बजरंग दल पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कत्तलखान्याकडे जाणाऱ्या वाहनांची नाकेबंदी केली होती. सिहोरा येथील बजरंग दल पदाधिकाऱ्यांनी भ्रमणध्वनीवर तुमसर येथील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून एम एच ३१, डब्ल्यू. ३४१९ हे चारचाकी वाहन नऊ गायींना घेऊन निघाले असा संदेश दिला. ठवरे पुतळयाजवळ बजरंग दल पदाधिकारी योगेश बुचे, प्रमोद चावटकर, धीरज धोटे, राहुल रणदिवे, लक्ष्मीकांत बालपांडे, चेतन ढबाले, करण चौधरी, सुधिर नेमा, सचिन चौधरी यांनी वाहन थांबविले. वाहनातील गाई कुठे घेऊन जात आहे असा प्रश्न वाहनचालक मोहम्मद रफीक मोहम्मद यासीन अंसारी (४८) रा. कामठी विचारला. कामठी येथील कत्तलखान्याकडे वाहनातील गाई नेत असल्याचे वाहन चालकाने सांगितले. कार्यकर्त्यांनी थेट वाहन चालकास पोलीस ठाण्यात घेऊन गेले.
तुमसर पोलिसांनी भादंवि २८९, सहकलम ११ (ड) १९०५ संरक्षक कायदा ८३/१७७ मोआका अंतर्गत गुन्हा दाखल करुन वाहनचालकास अटक केली. नंतर या गायींना लाखनी (रेंगेपार) येथील गोशाळेत पाठविण्यात आले. बजरंग दल पदाधिकाऱ्यांनी शनिवारी सिहोरा, तुमसर व चिचोली फाट्यावर कार्यकर्त्यांनी दूपारपासून पाळत ठेवली होती. बघेडा लेंडेझरी मार्गाने ही जनावरे कामठी येथे पोहचते केले. गोहत्या बंदीचा कायदा राज्य शासनाने मंजूर केला, परंतु राजरोसपणे कत्तलखान्याकडे गाई घेऊन जाणारी वाहने नेली जातात. येथे कायदा केवळ कागदावर दिसत आहे. सिहोरा, तुमसर ते कामठीचे अंतर किमान ६० ते ७० किमी आहे. रस्त्यात वाहने तपासणी केली जात नाही काय, असा प्रश्न असून अर्थकारणामुळे ते सर्रास सुरु आहे. कामठी येथे एकच कत्तलखाना सुरु आहे. या कत्तलखान्याला सुध्दा राजकीय पाठबळ असल्याची माहिती आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Catch the vehicle going to the slaughterhouse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.