कास्ट्राईबची आढावा बैठक
By Admin | Updated: March 18, 2015 00:49 IST2015-03-18T00:49:36+5:302015-03-18T00:49:36+5:30
मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी भंडारा यांच्या दालनात खाते व कार्यालयीन प्रमुख यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ ....

कास्ट्राईबची आढावा बैठक
भंडारा : मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी भंडारा यांच्या दालनात खाते व कार्यालयीन प्रमुख यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ भंडाराच्या पदाधिकारी व शिष्टमंडळाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. त्यात मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या विविध अन्यायग्रस्त प्रश्नांवर समाधानकारक चर्चा होवून काही प्रश्नाचा तात्काळ निपटाराही करण्यात येवून काही समस्या लवकरच निकाली काढण्याचे आश्वासन देण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे, जिलहा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी व निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महाजन आदींच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली.
प्रमुख मुद्यांमध्ये नगर परिषद भंडारा गांधी कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक, प्राचार्यांचे पद रोस्टरनुसार न भरणे, नगर परिषदेमधील वर्ग ३ व ४ च्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ५ व ६ व्या वेतन आयोगाची थक बाकी न देणे, नगर परिषद भंडारा येथील वर्ग क व ड ची अनुकंपातत्वावरील रिक्त पदे न भरणे, तसेच जिल्हा परिषद भंडारा मधील २४ वर्ष सलग सेवा झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकांना शासकीय परिपत्रक असूनही त्याला केराची टोपली दाखवून त्यांची निवड श्रेणी मंजूर न करणे, जिल्हाधिकारी कार्यालयातील तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी नियमानुसार अनुसूचित जातीचे रिक्त पदला जातीतून न भरता विशेष मागासवर्गीय संवर्गातून भरणे, संघटनेच्या दैनंदिन कामकाज व कार्यालयीन कामकाजाकरीता सामाजिक न्याय भवनातील एक कक्ष उपलब्ध करून देणे, समता नगर भंडारा वसाहतील मोबाईल टावरच्या उभारणीस तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्यामुळे सर्व नागरिकांनी लेखी विरोध दर्शवूनही न.प. ने टॉवर उभारणीस ना हरकत प्रमाणपत्र देणे.
या शिष्टमंडळाचे नेतृत्व अमृत बन्सोड, जिल्हाध्यक्ष गुलशन गजभिये, नरेंद्र बन्सोड, इंजि. रूपचंद रामटेके, वासुदेव नेवारे यांनी केले. (प्रतिनिधी)