कास्ट्राईब कर्मचाऱ्यांनी एकीतून प्रश्न सोडवावे
By Admin | Updated: August 30, 2014 23:28 IST2014-08-30T23:28:55+5:302014-08-30T23:28:55+5:30
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक चळवळीतील आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न एकतेने सोडविण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे अध्यक्ष अरुण गाडे यांनी केले.

कास्ट्राईब कर्मचाऱ्यांनी एकीतून प्रश्न सोडवावे
भंडारा : संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक चळवळीतील आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न एकतेने सोडविण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे अध्यक्ष अरुण गाडे यांनी केले. येथील पटवारी भवनात महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ जिल्हा भंडाराच्या वतीने आयोजित सभेला संबोधित करताना ते बोलत होते.
विदर्भातील कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या प्रलंबित असल्याने त्याला थेट शासन दरबारी मांडण्यापेक्षा आयुक्त नागपूरकर यांच्या कार्यालयात जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत समस्यांचे निराकरण करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात येत आहे. या दृष्टीने नियोजन करण्यासाठी जिल्हा आणि तालुका कार्यकारिणी संयुक्त सभा पटवारी भवनात घेण्यात आली.
या सभेत जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयातील सभेचे अहवाल वाचन करून चर्चा करण्यात आल्या. तालुक्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून प्राप्त अर्ज स्वीकारून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. यावेळी महाराष्ट्र कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे राज्य अध्यक्ष अरुण गाडे, सूर्यकांत हुमणे, विनेश शेवाळे, शेखर बोरकर, करण रामटेके, राजकुमार मेश्राम, नरेंद्र भोयर, अनमोल देशपांडे, सैनपाल वासनिक, जगमगाकर उके, नत्थू शेंडे, हेमलता भिमटे, संगीता मेश्राम, गवई, लक्ष्मी मेश्राम, जगदीश सुखदेवे, शैलेश जांभुळकर, मनोरमा डोंगरे, विनोद सुदामे, मेश्राम, विनोद राठोड, नरेंद्र पडोळे, घरडे, उपाध्ये, भोजराज अंबादे, गंगाधर भदाडे, प्रा. शिलवंत मडामे, प्रा. वंजारी, मानवटकर, अतुल लांजेवार आदी कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)