शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

देखणी पर्यटनस्थळे शापित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 22:57 IST

निर्सगाने मुक्तहस्ते उधळण केलेल्या भंडारा जिल्ह्यात विशाल पात्र असलेल्या वैनगंगेसह देखणी पर्यटन स्थळे आहेत. नैसर्गिक आणि मानवनिर्मित पर्यटन स्थळे जिल्ह्याला राष्ट्रीय नकाशावर झळकू शकतात. गोसेखुर्द प्रकल्प, कोका अभयारण्य, रावणवाडी, चांदपूर इको पर्यटन, आंबागड- पांगळी जलाशय, नागझिरा अभयारण्य यासह गौंड राजाच्या संपन्न वारसा सांगणारे किल्ले आहेत. वैनगंगेचे विशाल पात्र जलपर्यटनासाठी आदर्श आहे. परंतू पर्यटन स्थळांची सद्याची असलेली अवस्था पर्यटकांच्या मनस्तापात भर घालणारी आहे. प्रशासनाच्या चुकीच्या धोरणाने निर्सगाचा हा अनमोल खजाना शापित ठरत आहे.

ठळक मुद्देइच्छाशक्तीचा अभाव : निर्सगाने दिले पण प्रशासनाने गमावले

इंद्रपाल कटकवार।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : निर्सगाने मुक्तहस्ते उधळण केलेल्या भंडारा जिल्ह्यात विशाल पात्र असलेल्या वैनगंगेसह देखणी पर्यटन स्थळे आहेत. नैसर्गिक आणि मानवनिर्मित पर्यटन स्थळे जिल्ह्याला राष्ट्रीय नकाशावर झळकू शकतात. गोसेखुर्द प्रकल्प, कोका अभयारण्य, रावणवाडी, चांदपूर इको पर्यटन, आंबागड- पांगळी जलाशय, नागझिरा अभयारण्य यासह गौंड राजाच्या संपन्न वारसा सांगणारे किल्ले आहेत. वैनगंगेचे विशाल पात्र जलपर्यटनासाठी आदर्श आहे. परंतू पर्यटन स्थळांची सद्याची असलेली अवस्था पर्यटकांच्या मनस्तापात भर घालणारी आहे. प्रशासनाच्या चुकीच्या धोरणाने निर्सगाचा हा अनमोल खजाना शापित ठरत आहे.पितळ आणि तलावासाठी प्रसिद्ध असलेला भंडारा जिल्हा धान पिकासाठीही ओळखला जातो. सात तालुक्यांचा विस्तार असलेला हा जिल्हा म्हणजे निसर्गाचा अदभूत चमत्कारच म्हणावा लागेल. भाताची हिरवीगार शेते, घनदाट जंगल आणि बारमाही वाहनारी वैनगंगा या जिल्ह्याच्या समृद्धीत भर घालणारी आहे. सात तालुक्याच्या विस्तार असलेला हा जिल्हा पर्यटनासाठी आदर्श आहे. जिल्ह्याच्या मध्यभागातून गेलेला राष्टÑीय महामार्ग, मुंबई हावडा लोहमार्ग आणि ८० किलोमीटर असंतरावर असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ जगभरातील पर्यटकांना खेचून आणण्यास समर्थ आहेत.भंडारा शहरातून वैनगंगा वाहते. गोसे प्रकल्पाच्या बॅक वॉटरमध्ये शहरालगतचा परिसर येतो. या ठिकाणी संथ आणि अथांग पाण्याचा उपयोग पर्यटनासाठी होऊ शकतो. हा परिसर ‘बीओटी’ तत्वावर विकसित केला जाऊ शकतो. वॉटर स्पोर्ट, जलसफारी अशा विविध उपक्रमातून येथे चांगले पर्यटनस्थळ विकसित करात येवू शकते. वैनगंगा नदीच्या भरोश्यावर राज्य व राष्टÑीय स्तरावरील नौकानयन सारख्या स्पर्धांचेही आयोजन केले जाऊ शकते. यासाठी मोठ्या निधीची गरज नाही. केवळ गरज आहे ती इच्छा शक्तीची.तुमसर, पवनी व साकोली तालुक्यातील किल्ले इतिहासाची साक्ष देत आहेत. पूर्व विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या पवनीत पर्यटन विकासाला भरपूर वाव आहे. मात्र राजकीय इच्छाशक्तीचा अभावामुळे विकासाला मारक ठरत आहे. पर्यटन व तीर्थस्थळांतर्गत राष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्ध अभयारण्य व नव्याने घोषित करण्यात आलेल्या कोका वन्यजीव अभयारण्य, नागझीरा, अंबागड किल्ला, नृसिंह टेकडी माडगी, कोरंभी (भंडारा), रावणवाडी जलाशय, चकारा (अड्याळ), लाखा पाटलाची पहाडी, आंभोरा, दुर्गाबाई डोह गढकुंभली, शंकर महादेव नेरला देवस्थान, सोनी नदी संगम, गिरोला पहाडी, भृशुंड गणेश मंदिर, गोसावी मठ, गुढरी जलाशय, मांगलीबांध परिसर, उत्तरवाहिनी श्रीक्षेत्र मांढळ, चारभट्टी (पुयार), सिंदपुरी (रूयाळ), शिव-पर्वताची गुफा (धुटेरा-तुमसर), हनुमंत देवस्थान खोडगाव (मोहाडी), गायमुख देवस्थान, सानगडी येथील सहानगढ किल्ला, पवनी येथील किल्ला, गोसीखुर्द धरण परिसर, भंडारातील पांडे महाल, खांबतलाव, तुमसर तालुक्यातील पांगळी जलाशय परिसर यासह अनेक पर्यटनस्थळ व तिर्थस्थळे आजही विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. आंबागड येथे राजा बख्तबुलंदशहा द्वारे निर्मित कलात्मक व सुंदर वास्तुशिल्प निर्मित किल्ल्याचे दोन वर्षांपुर्वी किल्ल्याची डागडुजी करण्यात आली आहे.असा हा निसर्गाचा अनमोल खजना मात्र सध्या दुर्लक्षित आहे.पर्यटनस्थळांच्या विकासाबाबत राज्य शासन उदासीन आहे. ग्रीन हेरीटेज या पर्यावरणवादी संस्थेने अनेक उपक्रमातून राज्य शासनाकडे संबंधित पर्यटनस्थळांच्या विकासाबाबत पाठपुरावा केला आहे. उपेक्षित पर्यटन, प्राचीन वास्तूंचे विकास व जतन करण्याकरिता मुबलक निधी मंजूर करून त्यांचा भरीव विकास, अद्यावत विश्रामगृहे, होम स्टे यासह पर्यटक सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. तसेच जिल्ह्यात पर्यटन सूचना केंद्र शासनाने सुरू करावे.-मो.सईद शेख,अध्यक्ष ग्रीन हेरिटेज संस्था, भंडारा.