प्रवाशी प्लॅटफॉर्मवर मालवाहूंचा थांबा
By Admin | Updated: November 29, 2014 23:16 IST2014-11-29T23:16:19+5:302014-11-29T23:16:19+5:30
तुमसर रोड रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक एक वर मालवाहतूक रेल्वेगाड्या तासनतास उभ्या राहतात. याचा हजारो रेल्वे प्रवाशांना दररोज फटका बसत आहे.

प्रवाशी प्लॅटफॉर्मवर मालवाहूंचा थांबा
तुमसर : तुमसर रोड रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक एक वर मालवाहतूक रेल्वेगाड्या तासनतास उभ्या राहतात. याचा हजारो रेल्वे प्रवाशांना दररोज फटका बसत आहे.
शुक्रवारी दुपारी १ वाजता शेकडो प्रवाशांची मुंबई हावडा मेल चुकली. रेल्वे स्थानकावर गाडी आल्यावरही त्यांना ती दिसली नाही. रेल्वे विभागात नियोजनाचा अभाव दिसून येतो. दुसरीकडे रेल्वे ट्रक प्रवाशांना ओलांडता येत नाही.
फूटवे ब्रीज वरून मार्गक्रमण करावा, असा नियम आहे, परंतु येथे फूटवे ब्रीज अर्धवट आहे. दक्षिण पूर्व रेल्वेचे तुमसर रेल्वे जंक्शन मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर आहे. येथे सहा प्लॅटफार्म आहेत. रेल्वे स्थानकावर प्रवेश करताच प्लॅटफार्म क्रमांक एकवर सतत मालवाहतूक रेल्वे गाड्या तासनतास उभ्या राहतात. दीड ते दोन दिवस त्यांचा थांबा राहतो. प्लॅटफॉर्म क्रमांक हा जणू मालवाहतूक गाड्यांकरीता आरक्षित ठेवल्याचे दिसते. (तालुका प्रतिनिधी)
मुंबई हावडा-हावडा मुंबई जलद रेल्वे गाड्यांचा येथे प्लॅटफॉर्म क्रमांक २ व ३ वर थांबा रेल्वे विभागाने दिला आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर डाऊन प्रवाशी गाड्यांचा थांबा सुरू करण्याची गरज आहे. सध्या अप प्रवाशी गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ तर डाऊन प्रवाशी गाड्या २ वर थांबतात. मालवाहतूक रेल्वे गाड्या येथे सहा क्रमांकावर तासनतास उभ्या करण्याची गरज आहे. नियमावर बोट ठेवणारी रेल्वे यंत्रणा येथे प्रवाशांना शारीरिक व मानसिक त्रास मागील अनेक महिन्यापासून देत आहे. यामुळे वृद्ध व लहान मुलांना याचा फटका बसतो. विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या मागील भेटीत याची तक्रार केली होती, परंतु अद्याप कारवाई झाली नाही. (तालुका प्रतिनिधी)