आवडीच्या विषयात करिअर घडवा
By Admin | Updated: December 15, 2014 22:51 IST2014-12-15T22:51:55+5:302014-12-15T22:51:55+5:30
विद्यार्थिनींनी निवडक विषयांच्या मागे न धावता एक बालक, एक शिक्षक, एक पुस्तक याप्रमाणे स्वत:च्या आवडीचे विषय निवडून त्यात करीअर घडवावे व प्रगत राष्ट्राची स्वप्नपूर्ती करावी,

आवडीच्या विषयात करिअर घडवा
भंडारा : विद्यार्थिनींनी निवडक विषयांच्या मागे न धावता एक बालक, एक शिक्षक, एक पुस्तक याप्रमाणे स्वत:च्या आवडीचे विषय निवडून त्यात करीअर घडवावे व प्रगत राष्ट्राची स्वप्नपूर्ती करावी, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्याचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. धर्मराज तिडके यांनी केले.
स्थानिक नूतन कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक स्रेहसंमेलनाच्या उद्घटनाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. अनुप रडके व डॉ. सुलभा रडके यांच्या हस्ते स्व. मालिनी रडके स्मृती गृहविज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. धर्मराज तिडके, मीना तिडके, डॉ. अनुप रडके, डॉ. सुलभा रडके, हेमंत रडके, साधना रडके, मनोहर रडके, प्राचार्या अमिता तिवारी, न्यू गर्ल्स संस्थेचे सचिव अॅड. एम.एल. भुरे, सदस्या रेखा पनके व उपमुख्याध्यापिका शीला भुरे उपस्थित होत्या.
शालांत परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आलेल्या क्षितिजा राजाभोज, पूजा फाये, शिवानी पशिने, आस्था क्षीरसागर यांना गौरविण्यात आले. तर नम्रता गंगवानी हिला आदर्श विद्यार्थिनी, दिव्या धकाते, एन.सी.सी. बेस्ट कॅडेट तसेच ए.एन.ओ. रश्मी मोहरकर यांना ग्वालिअर येथे आॅफिसर प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल गौरविण्यात आले. याप्रसंगी शालेय वार्तापत्र प्रतिबिंबचे विमोचन मीना तिडके यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी नृत्य व गीते सादर केली. प्रास्ताविक प्राचार्या अमिता तिवारी, संचालन विभा पांडे, आभार उपमुख्याध्यापिका शिला भुरे, बक्षीस वितरण संचालन लता ब्राह्मणकर यांनी तर अहवाल वाचन विद्यार्थिनी नम्रता गंगवानी व अपूर्वा सूर्यवंशी यांनी केले. (शहर प्रतिनिधी)