कार्बाईडने पिकविलेला १० हजारांचा आंबा जप्त

By Admin | Updated: May 23, 2015 01:14 IST2015-05-23T01:14:05+5:302015-05-23T01:14:05+5:30

अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने घातलेल्या धाडीत ४९६ किलो कार्बाइडयुक्त आंबा जप्त करण्यात आला.

Carbide seized 10,000 mangoes of Pickville | कार्बाईडने पिकविलेला १० हजारांचा आंबा जप्त

कार्बाईडने पिकविलेला १० हजारांचा आंबा जप्त

भंडारा : अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने घातलेल्या धाडीत ४९६ किलो कार्बाइडयुक्त आंबा जप्त करण्यात आला. जप्तसाठा घनकचरा व्यवस्थापन केंद्रात नष्ट करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास तुमसर येथील गंज बाजार परिसरा करण्यात आली.
अन्न व औषध प्रशासन भंडारा कार्यालयाला मिळालेल्या माहितीच्या आधारे सागर फ्रुट सेंटर, गंज बाजार तुमसर येथे पथकाने धाड घातली. येथे आंबा फळाचा साठा कार्बाईड पावडर या घातक रासायनिक पदार्थांच्या सहायाने कृत्रिमरत्ीया पिकविले जात असल्याचे आढळून आले. या कार्बाईडयुक्त आंब्याचा एक नमुना घेवून ४९६ किलो किंमत ९,९२० रुपयांचा साठा जप्त केला. कॅल्शियम काबाईड पावडरचा साठ्यातून एक नमुना घेण्यात येऊन जप्त केलेला सर्व साठा तुमसर पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन केंद्र, तुमसर येथे नष्ट केला. मानवी सेवनास सकस व निर्भळ अन्न उपलब्ध होण्याबाबतच्या अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ च्या उद्देशाने जनहितार्थ व जन आरोग्याच्या दृष्टीकोनातून सर्व फळे व्यवसायिकांना फळे पिकविण्यासाठी कार्बाईडसह कोणत्याही प्रतिबंधित रसायनाचा उपयोग न करता चांगल्या दर्जाची व योग्य पध्दतीचा वापर करुन पिकविलेली फळे जनतेस उपलब्ध करुन द्यावे, असे आवाहन केले. गैरकायदेशिर मार्गाचा वापर करुन फळे पिकविणाऱ्या व्यवसायिकांविरुध्द कडक कारवाई करण्यात येणार आहे, असे स्पष्ट संकेत सहआयुक्ताांनी दिले. ही कारवाई सहायक आयुक्त (अन्न) बी. जी. नंदनवार यांच्या मार्गदर्शनात अन्न सुरक्षा अधिकारी व्ही. पी. धवड यांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Carbide seized 10,000 mangoes of Pickville

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.