शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

पुरात वाहून गेली कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 22:16 IST

साकोली तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले. उसगाव, मक्कीटोला येथील नाल्यावरील पुलाजवळ चक्क एक कार पूराच्या पाण्यात वाहून गेली. नागरिकांनी वेळीच दखल घेवून कारमधील दोघांना वाचविले. साकोली तालुक्यात सोमवारी पहाटेपासूनच पावसाला सुरूवात झाली.

ठळक मुद्देदोन जण बचावले : साकोली तालुक्यात मुसळधार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा/साकोली : जिल्ह्यात आठवडा भराच्या विश्रांतीनंतर वरूण राजाने पुन्हा दमदार हजेरी लावली.साकोली तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले. उसगाव, मक्कीटोला येथील नाल्यावरील पुलाजवळ चक्क एक कार पूराच्या पाण्यात वाहून गेली. नागरिकांनी वेळीच दखल घेवून कारमधील दोघांना वाचविले.साकोली तालुक्यात सोमवारी पहाटेपासूनच पावसाला सुरूवात झाली.शहरासह ग्रामीण क्षेत्रात बरसलेल्या पावसामुळे नदी-नाल्यांनाही पूर आला. उसगाव-मक्कीटोला येथे असलेल्या नाल्याच्या पुलाजवळून कार जात असताना पाण्याच्या प्रवाहात कार वाहून गेली. नागरिकांच्या सहकार्याने दोघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले. देवचंद चांदेवार व मुनेश्वर करंजेकर दोन्ही रा. साकोली अशी बचावलेल्या इसमांची नावे आहेत. चांदेवार हे साकोलीहून चांदोरीकडे जात असताना ही घटना घडली.पुलावरून पाणी वाहत असताना पूल ओलांडण्याच्या प्रयत्न करण्यात आला. समयसुचकता दाखवित चांदेवार यांनी कारमधून उडी घेतली व जवळच असलेल्या झाडाचा आसरा घेतला. यावेळी करंजेकर हे कारसोबत वाहून गेले. घटनास्थळावर एकच गर्दी झाली. गावकऱ्यांनी धावपळ करून दोराच्या सहायाने कार व करंजेकर यांना पाण्याबाहेर काढले.जिल्ह्यात सर्वत्र पाऊसगत २४ तासात पावसाने सर्वदूर हजेरी लावली. जिल्ह्यात एकूण सरासरी ६.८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. यात भंडारा तालुक्यात ३.३ मि.मी., मोहाडी ४.२, तुमसर २० मि.मी., साकोली १०.२ मि.मी. तर पवनी तालुक्यातही पाऊस बरसल्याची माहिती आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ८६ टक्के पाऊस बरसला आहे. यादरम्यान वेधशाळेने अजून दोन दिवस पाऊस बरसण्याची शक्यता वर्तविली आहे.

टॅग्स :floodपूर