अज्ञात इसमाने जाळली पोलीस उपनिरीक्षकांची कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:26 IST2017-07-20T00:26:38+5:302017-07-20T00:26:38+5:30
अंधाराचा फायदा घेत अज्ञात इसमाने गडकुंभली रोड साकोली येथे राहणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक वानखेडे यांची कार व वाडीभस्मे यांच्या मालकीचा नवीन ट्रक जाळले.

अज्ञात इसमाने जाळली पोलीस उपनिरीक्षकांची कार
साकोली येथील प्रकार : २५ लक्ष रुपयांचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : अंधाराचा फायदा घेत अज्ञात इसमाने गडकुंभली रोड साकोली येथे राहणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक वानखेडे यांची कार व वाडीभस्मे यांच्या मालकीचा नवीन ट्रक जाळले. यात २५ लक्ष रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. याची तक्रार साकोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
साकोली पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक वानखेडे हे गडकुंभली रोड साकोली येथील वाडीभस्मे यांच्या घरी भाड्याने राहतात. नेहमीप्रमाणे वानखेडे यांची कार क्रमांक एम.एच. ३६ एच ७२९६ ही घरासमोर पार्क केली होती. वाडीभस्मे यांनी १७ जुलै रोजी नवीन ट्रक खरेदी करून आणला. ट्रक व कार दोन्ही आजूबाजूला उभे असताना अज्ञात इसमांनी दोन्ही वाहनांना आग लावली. यात दोन्ही वाहनांचे जवळपास २५ लक्ष रुपयांचे नुकसान झाले. यापूर्वी दोन महिन्यापूर्वी वानखेडे यांच्या कारवर अज्ञात इसमांनी अंडे फेकले होते. या संपूर्ण प्रकरणाची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.