कार झाडावर आदळली
By Admin | Updated: May 26, 2015 00:34 IST2015-05-26T00:34:05+5:302015-05-26T00:34:05+5:30
मध्य प्रदेशातील आंजनगिरी येथून आंबागड येथे सहल घेऊन येणारे चारचाकी वाहन अनियंत्रित होऊन झाडावर आदळले.

कार झाडावर आदळली
१० प्रवासी जखमी : सुंदरटोला वळणावरील घटना
तुमसर : मध्य प्रदेशातील आंजनगिरी येथून आंबागड येथे सहल घेऊन येणारे चारचाकी वाहन अनियंत्रित होऊन झाडावर आदळले. या अपघातात १० प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले. हा अपघात सोमवारला दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास सुंदरटोला वळणार घडला.
यात चालक प्रमोद बिजेवार (२८) व रामकुशन बिजेवार (२२) रा. टेमनी, हिमांशू बिजेवार (१४), विशाल पुष्पतोडे (२५), भीमलता पुष्पतोडे (६०), पूजा पुष्पतोडे (२२), राहुल पुष्पतोडे (६), हुसेन पुष्पतोडे (३०), हिमांशी पुष्पतोडे (२) सर्व रा. आंजनगिरी, देविश तांडेकर (७) रा. निजोटेकडी हे गंभीर जखमी झाले. चालक बिजेवार याला भंडारा येथे हलविण्यात आले. चौघांची प्रकृती चिंताजनक असून सर्व गंभीर जखमींवर तुमसर येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाहन नवीन असल्यामुळे क्रमांक नव्हता. प्रवाशांनी भरलेले विना क्रमांकाचे वाहन महाराष्ट्राच्या सीमेत दाखल कसे झाल्यामुळे आंतरराज्यीय सीमा सुरक्षित नसल्याचे दिसून आले आहे. (तालुका प्रतिनिधी)