पुलाखाली कार कोसळली, एक ठार ; तिघे गंभीर
By Admin | Updated: June 17, 2017 00:32 IST2017-06-17T00:32:53+5:302017-06-17T00:32:53+5:30
राजुरा तालुक्यातील सोंडो गावापासून जवळच असलेल्या पुलाखाली कार कोसळल्याने एक जण जागीच ठार तर तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री ७.१५ वाजता घडली.

पुलाखाली कार कोसळली, एक ठार ; तिघे गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
देवाडा : राजुरा तालुक्यातील सोंडो गावापासून जवळच असलेल्या पुलाखाली कार कोसळल्याने एक जण जागीच ठार तर तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री ७.१५ वाजता घडली.
साईनाथ शेषराव मुंडे (२६) रा. इंद्रवेली, जि. आदिलाबाद असे मृताचे नाव आहे. तर विकास मुंडे, विलास फड, गणेश थेरे अशी जखमींची नावे आहेत. वास्तूपुजन कार्यक्रमासाठी साईनाथ मुंडे हे एक दिवस अगोदर देवाडा येथे आले होते. ते मित्रांसोबत दिवस घालविल्यानंतर रात्री ७ वाजता राजुराकडे कारने जात असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पुलाच्या लोखंडी कठड्याला धडक बसली व कार पुलाखाली कोसळली. यात साईनाथ मुंडे यांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना चंद्रपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.