दारु वाहतूक करणाऱ्या कारचा अपघात, चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 22:27 IST2019-02-27T22:26:43+5:302019-02-27T22:27:06+5:30

भरधाव कारने एका वाहनाला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना साकोलीनजीक मोना टायर कंपनीजवळ बुधवारी पहाटे घडली. अपघातानंतर कारची तपासणी केली असता यात दारु आढळून आली.

A car accident, driver dies | दारु वाहतूक करणाऱ्या कारचा अपघात, चालक ठार

दारु वाहतूक करणाऱ्या कारचा अपघात, चालक ठार

ठळक मुद्देसाकोलीची घटना : कारमधून ४५ हजार रुपयांची दारु जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : भरधाव कारने एका वाहनाला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना साकोलीनजीक मोना टायर कंपनीजवळ बुधवारी पहाटे घडली. अपघातानंतर कारची तपासणी केली असता यात दारु आढळून आली.
प्रवीण जगदीश सेल्लर (२०) रा.भिलाई असे मृताचे नाव आहे. लाखनीवरून कार क्रमांक एमएच ३१ सी आर ८१११ भिलाईकडे जात होती. बुधवारी पहाटे साकोली जवळील मोना टायर कंपनीजवळ अज्ञात वाहनाला या कारने मागून धडक दिली. यात प्रवीण जागीच ठार झाला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कारची झडती घेतली तेव्हा त्यात गोवा व्हीस्कीचे १० बॉक्स आढळून आले. अवैध दारुवाहतूक सुरु असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

Web Title: A car accident, driver dies