शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

उमेदवारांनो, खर्चाचा तपशील न दिल्यास याल अडचणीत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 11:19 IST

Bhandara : २३ डिसेंबरपर्यंत खर्च निवडणूक शाखेकडे सादर करण्याची मुभा

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. आता प्रत्येक उमेदवाराला झालेल्या खर्चाचे तपशील द्यावा लागणार आहे. निकाल लागल्यापासून एक महिन्याच्या आत म्हणजेच २३ डिसेंबरपर्यंत उमेदवाराला आपला खर्च निवडणूक शाखेकडे सादर करावा लागणार आहे. संबंधित उमेदवारांकडून पुढील आठवड्यापासून खर्चाचा तपशील जमा होण्यास सुरुवात होईल. त्यात काही तफावत आढळल्यास त्याबाबत नोटीस पाठवून खुलासा मागविला जाईल. निवडणूक कालावधीत उमेदवारांनी प्रचारासाठी केलेल्या खर्चाचा तपशील सादर करणे बंधनकारक आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, उमेदवारांनी आपल्या निवडणूक खर्चाकरिता स्वतंत्र बँक खाते उघडून त्यातूनच व्यवहार करणे आवश्यक होते. निवडणुकीसाठी उघडलेल्या बँक खात्यातून उमेदवाराने आपला निवडणूक खर्च धनादेश धनाकर्ष, आरटीजीएस, एनईएफटीद्वारे करणे आवश्यक आहे. जाहिरातीचा खर्च निवडणूक खर्चाची बाब म्हणून गणली जाणार आहे. उमेदवारांना खर्चाची लिखित नोंद ठेवावी लागते.

भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार या लेखांची तपासणी निवडणूक खर्च निरीक्षक यांच्याकडून मतदान होण्यापूर्वी तीन वेळा करावी लागते. उमेदवारांना नोंदवही दिलेली असून, त्यांनी केलेला खर्च व्यवस्थितरीत्या लिहावा असे अपेक्षित आहे. लिहिलेल्या नोंदी तपासून खर्च निरीक्षकांची स्वाक्षरी घेणे हे उमेदवार अथवा उमेदवाराचे प्राधिकृत प्रतिनिधी यांचे काम असते. त्यात तफावत असल्यास उमेदवारांना नोटीस जारी करण्यात येते. खर्चाच्या नोंदी नीट लिहाव्या, यासाठी मार्गदर्शनही केले जाते. प्रशिक्षणाद्वारे नोंदी कशा घ्याव्या हे सांगण्यात आलेले आहे

२३ डिसेंबरपर्यंत द्यावा लागणार तपशील विधानसभा निवडणुकीसाठी ४० लाख रुपयांच्या खर्चाची मर्यादा होती. अर्ज भरल्याच्या दिवसापासून निवडणुकीदरम्यान सर्व उमेदवारांना टप्प्याटप्प्याने खर्चाचे हिशेब द्यावे लागत होते. आता विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून एक महिन्याच्या आत म्हणजेच २३ डिसेंबरपर्यंत निवडणूक खर्चाचा तपशील उमेदवारांना सादर करावा लागणार आहे.

५० उमेदवारांनी लढली निवडणूकजिल्ह्यातील तीन मतदारसंघांतील ५० उमेदवारांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. सर्वाधिक उमेदवारांची संख्या ही भंडारा मतदारसंघात १९ एवढी होती. त्यामुळे मतदानासाठी दोन ईव्हीएम मशीन लागल्या होत्या. तुमसर मतदारसंघात १८ उमेदवार होते. सर्वांत कमी उमेदवार साकोली मतदारसंघात केवळ १३ उमेदवार असल्याने एकच ईव्हीएमचा वापर करावा लागला.

कोणत्या मतदारसंघातून किती?मतदारसंघ           उमेदवार तुमसर                      १८ भंडारा                      १९ साकोली                    १३ एकूण                       ५० 

खर्च सादर न केल्यास निवडणूक लढण्यावर बंदी

  • जिल्ह्यात निवडणूक लढविलेल्या उमेदवारांना निवडणूक खर्चाचा अंतिम हिशेब देण्यासाठी २३ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत सर्व उमेदवारांना निवडणूक खर्चाची तपशील निवडणूक शाखेकडे जमा करावा लागणार आहे.
  • संबंधित उमेदवारांकडून पुढील आठवड्यापासून खर्चाचा तपशील जमा होण्यास सुरुवात होईल. त्यात काही तफावत आढळल्यास त्याबाबत नोटीस पाठवून खुलासा मागविला जाईल. खर्च सादर न केल्यास संबंधित उमेदवारास पुढे निवडणूक लढण्यावर बंदी आणली जाऊ शकते.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Politicsराजकारणbhandara-acभंडारा