शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
3
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
4
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
5
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
6
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
7
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
8
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
9
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
10
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
11
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
12
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
13
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
14
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
15
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
16
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
17
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
18
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
19
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
20
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस

१४ दिवसांत पोहोचावे लागेल उमेदवारांना २६६ गावांत; सोशल मीडियावर प्रचारास प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 11:18 IST

एका दिवशी १९ गाव : उमेदवारांची दमछाक होणार

राजू बांते लोकमत न्यूज नेटवर्क मोहाडी : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडी व महायुतीमधील नेत्यांना समजावण्यात वेळ जात आहे. त्यांच्या बैठका होत आहेत. अंतिम नामनिर्देशन मागे घेण्याच्या दिवसानंतर उमेदवारांचा प्रचार सुरू होणार आहे. केवळ १४ दिवसांत २६६ गाव उमेदवारांना पिंजून काढावे लागणार आहेत.

निवडणूक कार्यक्रमानुसार तुमसर - मोहाडी विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांना मोहाडी तालुक्यातील १०७ गाव तर तुमसर तालुक्यातील १५९ गाव-पाडे पिंजून काढावे लागणार आहेत. तुमसर तालुका काहीअंशी आदिवासीबहुल आहे. आंबागड, गायमुख या भागातील सातपुड्याच्या पायथ्याशी काही प्रमाणावर आदिवासींची वस्ती आहे. 

मध्यप्रदेशच्या सीमांकनापर्यंत असलेला बपेरा गाव, दुसरीकडे डोंगरी बुद्रुक असा चौफेर तुमसर तालुका विस्तारलेला आहे. तसेच मोहाडी तालुका दोन भागात विभाजित झालेला आहे. हिवरा गावापर्यंत इकडे पाहुणी, भोसा वैनगंगा नदीच्या दुसऱ्या भागाला खडकी, देव्हाडा बुद्रुक असा विस्तारलेला मोहाडी तालुका आहे. त्यामुळे प्रचार करताना निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांना चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे.

उमेदवार कुणीही असो, सर्वांना अनेक गावे १४ दिवसांत पिंजून काढावी लागणार आहेत. प्रचाराला दिवस कमी आणि गावे जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. १४ दिवसांचा कालावधी प्रचार करण्याचा असल्यामुळे किमान १९ गावात प्रत्येक दिवशी मतदारांकडे जावे लागणार आहे. 

प्रचार होणार हायटेक प्रचार म्हटला की, पूर्वी हातात झेंडे, पत्रके किवा वाहनांवर भोंगे लावून प्रचार केला जात होता. आता तो प्रकार अत्यंत कमी बघायला मिळतो. जमाना हायटेक झाला आहे. जुन्या पद्धती बाजूला सारून आता कार्यकर्ते स्मार्ट सिस्टीमचा अवलंब करू लागले आहेत. स्मार्ट फोनच्या माध्यमातून विविध पक्षांचे नेते व त्यांचे कार्यकर्ते फेसबुक व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून प्रचाराला प्रारंभ केला आहे. ४ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. ५ नोव्हेंबरपासून रिंगणातील उमेदवारांच्या मोठ्या प्रमाणात प्रचाराचा धुरळा उडणार आहे.

उमेदवारांपुढे आव्हान २० नोव्हेंबर ही मतदानाची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांचे समर्थक सोशल मीडियाच्या वापरात अग्रेसर दिसणार आहेत. कमी वेळेत समर्थक उमेदवारांचा प्रचार आणि विरोधक उमेदवारांचा नकारात्मक प्रचार सोशल मीडियाच्या माध्यमातून करणार असल्याचे चित्र आहे. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात प्रचार हायटेक होणार आहे. फेसबुक आणि व्हॉट्सअॅप सोशल मीडियाचा प्रचारासाठी वापर वाढला आहे. तरीही उमेदवाराला मतदारांच्या संपर्कासाठी एकदा तरी जावेच लागणार आहे. दुसरीकडे, सध्या व्हॉट्सअॅप संवाद साधण्याचे अतिमहत्त्वपूर्ण माध्यम बनले आहे. या माध्यमातून संपर्कात राहण्याचा प्रयत्न असतो. याचा प्रचारात वापर होणार असल्याचे सध्यातरी दिसत आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४bhandara-acभंडारा