मापीसा कायदा रद्द करा
By Admin | Updated: September 15, 2016 00:32 IST2016-09-15T00:32:49+5:302016-09-15T00:32:49+5:30
महाराष्ट्र प्रोटेक्शन आॅफ इंन्टरनल सेक्युरीटी अॅक्ट २०१६ (मापीसा) हा कायदा आणण्याचे प्रस्तावित केले आहे.

मापीसा कायदा रद्द करा
मुख्यमंत्र्यांना निवेदन : तालुका काँग्रेस कमेटीची मागणी
लाखांदूर : महाराष्ट्र प्रोटेक्शन आॅफ इंन्टरनल सेक्युरीटी अॅक्ट २०१६ (मापीसा) हा कायदा आणण्याचे प्रस्तावित केले आहे. परंतु यात अत्यंत जाचक ठरून जनतेची डोकेदुखी ठरणारा असल्याने तालुका काँग्रस कमिटीच्या वतीने कायदा रद्द करावा, अशी मागणी केली आहे.
१०० किंवा त्यापेक्षा जास्त जनसमुदायाला पोलीस परवागनी घेणे बंधनकारक राहील व सुरक्षिततेची जबाबदारी आयोजकांवर राहील. लग्नसमारंभ, अंत्यसंस्कार, वाढदिवस, घरगुती कार्यक्रमांवर बंधने येतील. नायब तहसीलदार कावळे यांनी निवेदन स्विकारले. यावेळी तालुकाध्यक्ष भुमेश्वर महावाडे, सभापती मंगला बगमारे, जि. प. सदस्य मनोहर राऊत, जि. प.सदस्य रमेश डोंगरे, ईश्वर घोरमोडे, प्रदीप बुराडे, ताराचंद मातेरे, धम्मदीप रंगारी, वासुदेव तोंडरे, रामचंद्र परशुरामकर, मधुकर पारधी, बाळू शिलार, विलास पिलारे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)