चांदपूर जलाशयांतर्गत कालवा विकास थंडबस्त्यात

By Admin | Updated: September 27, 2016 00:34 IST2016-09-27T00:34:09+5:302016-09-27T00:34:09+5:30

चांदपूर जलाशयाअंतर्गत पाणी वाटप करणारी नहर आणि कालव्याचे निधी अभावी दुरवस्था झाली आहे.

Canal development under cold water in Chandrapur Water Resource | चांदपूर जलाशयांतर्गत कालवा विकास थंडबस्त्यात

चांदपूर जलाशयांतर्गत कालवा विकास थंडबस्त्यात

४० कोटींची आवश्यकता : पाणी वाटपात कर्मचाऱ्यांची कसरत
रंजीत चिंचखेडे चुल्हाड (सिहोरा)
चांदपूर जलाशयाअंतर्गत पाणी वाटप करणारी नहर आणि कालव्याचे निधी अभावी दुरवस्था झाली आहे. टेल शिवारात पाणी वाटप करताना कर्मचाऱ्यांची कसरत होत आहे. नहर विकासाचे नियोजन थंडबस्त्यात असल्याने पॅकेज मंजूर करण्याची शेतकऱ्यांची ओरड आहे.
तुमसर तालुक्यात मध्यम प्रकल्प असलेल्या चांदपूर जलाशयाची व्याप्ती मोडी आहे. विस्ताराने वाढीव क्षेत्र असल्याने सिहोरा येथे स्वतंत्र लघु पाटबंधारे विभागाचे कार्यालय आहे. यात जलाशयांतर्गत डावा आणि उजवा असे दोन प्रमुख कालवे परिसरात आहेत.
यातून १४ हजार हेक्टर आर शेतीला पाणी वाटप केले जाते. या कालव्याअंतर्गत शेत शिवारात नहर आणि पाटचाऱ्याची निर्मिती करण्यात आली आहे. परंतू कालवे आणि नहराची निधी अभावी दूरवस्था झाली आहे. कालव्यात मोठ्या प्रमाणात झुडपी वाढली आहे. परिणामी पाणी वाटपासाठी कर्मचाऱ्यांची कसरत होत आहे. दरवर्षी नहरामध्ये माती आणि गाळ जमा होत असल्याने टेलवर पाणी पोहचत नाही.
यामुळे शेतकऱ्यांना नापिकीला सामोरे जावे लागत आहे. मुख्य कालव्याचे सिमेंट अस्तरीकरण उखडले असून कुठेकुठे भेगा पडलेल्या आहेत. यामुळे कालव्याची रुंदी धोकादायक ठरु पाहत आहे. कालव्याच्या पाळीवरुन रहदारी करणे धोकादायक ठरत आहे.
संपूर्ण कालवे आणि नहराचे सिमेंट अस्तरीकरण करणे गरजेचे आहे. मात्र याच कामाचे नियोजन थंडबसत्यात आहे. कालवा आणि नहराच्या विकासासाठी जवळपास ४० कोटी रुपयांची गरज आहे. स्वतंत्र पॅकेज अंतर्गत निधी उपलब्ध करण्यात आलेला नाही.
कालव्यांची स्वच्छता ही करण्यात आलेली नाही. बपेरा परिसरातील शेती नव्याने चांदपूर जलाशयाला जोडण्यात आली आहे. जुन्या झालेल्या जिर्ण नहराचे जलाशयाचे पाणी वाटप करण्यात येत आहे. सिलेगाव पंचायत समिती क्षेत्राअंतर्गत जोडण्यात आलेला शेतशिवार टेलवर आहे. या शेतशिवारात जलदगतीने पाणी थेट शेतात पोहचत नाही. अल्प कर्मचाऱ्याच्या खांद्यावर पाणी वाटपाचा डोलारा आहे. लघु पाटबंधारे विभागात ७० टक्के पद रिक्त आहे.
महत्वपूर्ण असलेल्या शाखा अभियंत्याची पदे रिक्त आहेत. मजूर कार्यरत आहेत. परिणामी याचा फटका परिसरातील शेतकऱ्यांना नाहक बसत आहे.

सिलेगाव पंचायत समिती क्षेत्र अंतर्गत शेतशिवार टेलवर आहे. नहराचे अस्तरीकरण रखडल्याने पाणी मिळत नाही. समस्या निकाली काढण्यासाठी पॅकेजची गरज आहे.
- हिरालाल नागपूरे, गटनेता, पंचायत समिती सदस्य
परिसरात नहराचे आधुनिक पध्दतीने कामे केली जात आहे. पाणी वाटप पूर्ण करण्याचा हेतूने नहरांची स्वच्छता करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी यंत्रणा प्रयत्न करीत आहेत.
- एस. एन. वाईनदेशकर, शाखा अभियंता, सिहोरा

Web Title: Canal development under cold water in Chandrapur Water Resource

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.