लोकचळवळीच्या रूपाने अभियान राबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 21:43 IST2018-09-18T21:43:10+5:302018-09-18T21:43:41+5:30
स्वच्छतेच्या माध्यमातून निरोगी आयुष्य जगता येते, गावांची स्वच्छता करून नागरिकांच्या आरोग्याला रोगराईपासून मुक्त करता येते. त्यामुळे स्वच्छता ही सेवा व्यापक जनजागृती अभियान ग्रामस्तरावर लोकचळवळीच्या रूपाने राबवावे, असे आवाहन आरोग्य व बांधकाम समिती सभापती प्रेमदास वनवे यांनी केले.

लोकचळवळीच्या रूपाने अभियान राबवा
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : स्वच्छतेच्या माध्यमातून निरोगी आयुष्य जगता येते, गावांची स्वच्छता करून नागरिकांच्या आरोग्याला रोगराईपासून मुक्त करता येते. त्यामुळे स्वच्छता ही सेवा व्यापक जनजागृती अभियान ग्रामस्तरावर लोकचळवळीच्या रूपाने राबवावे, असे आवाहन आरोग्य व बांधकाम समिती सभापती प्रेमदास वनवे यांनी केले.
जिल्हा परिषद जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष यांचे वतीने जिल्हा परिषद सभागृहात पार पडलेल्या स्वच्छता ही सेवा अभियानाचे जिल्हास्तरीय शुभारंभ व कार्यशाळेप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे, जिल्हाधिकारी शांतनू गोयल व मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांचे समन्वयाने भंडारा जिल्ह्यात १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर सपाटे, कार्यकारी अभियंता एम.बी मैदमवार, जिल्हा आरोग्य अधिकारी कमलेश भंडारी, उप शिक्षणाधिकारी दुबे, भंडाराचे गट विकास अधिकारी नुतन सावंत, पवनीचे गट विकास अधिकारी अनिता तेलंग, तुमसरचे गट विकास अधिकारी मिलींद बडगे, साकोलीचे गट विकास अधिकारी सुनील तडस, मोहाडीचे गट विकास अधिकारी रविंद्र वंजारी, लाखनीचे गट विकास अधिकारी के.के. ब्राम्हणकर, आरोग्य विभागाच्या प्रशासन अधिकारी डॉ. लतीका गरूड, बालविकास प्रकल्प अधिकारी शितल फडके व अधिका-यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर सपाटे यांनी केले. या प्रसंगी पाणी गुणवत्ता सल्लागार प्रशांत मडामे यांनी स्वच्छता ही सेवेची शपथ देवून स्वच्छतेसाठी कार्य, श्रमदान करण्याचे आवाहन केले.
कृती आराखड्याचे सादरीकरण
कार्यशाळे प्रसंगी वित्त नि संपादणूक सल्लागार बबन येरणे यांनी अंमलबजावणी आराखडयाचे वाचन करून ग्रामस्तरावर राबविण्यात येणा-या उपक्रमाची माहिती दिली. १५ सप्टेंबरपासून दर दिवशी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचे नियोजन सांगितले. अभियान काळात गट विकास अधिकारी यांनी ग्रामस्तरावर स्वच्छता ही सेवेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, याकरिता तालुकास्तरावरून संपर्क अधिकारी नियुक्त करून संनियंत्रण करावे असे आवाहन करण्यात आले.
कलापथकाच्या सादरीकरणातून प्रबोधन
जिल्हास्तरीय शुभारंभ तथा कार्यशाळेत असर फाउंडेशनच्या वतीने कलापथक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता ही सेवा व्यापक जनजागृती अभियान कार्यक्रमाचे सादरीकरण कलापथकाचे माध्यमातून मांडण्यात आले. शाश्वत स्वच्छता, समग्र स्वच्छता, सेवा दिवस, स्वच्छता श्रमदानाचा महायज्ञ, स्वच्छ भारत दिवस व या अभियानाला लोकसहभागाची असलेली गरज यावर गित व बतावणी करून असरच्या फाऊडेशनच्या कलावंतांनी कार्यक्रमाचे सादरीकरण करून स्वच्छता ही सेवा अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
ग्रामपंचायतींचा गौरव
सन २०१६-१७ व २०१७-१८ या वर्षातील संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात सहभागी होवून उत्कृष्ठ कार्य करणाºया ग्रामपंचायतींचा सत्कार यावेळी करण्यात आला. अतिथींच्या हस्ते जिल्हा व तालुकास्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषीकाचे मानकरी ठरलेल्या ग्राम पंचातींचे सरपंच, उपसरपंच, सचिव यांना सन्मानपत्र व धनादेशाचे वितरण करण्यात आले. संचालन व आभार पाणी गुणवत्ता सल्लागार प्रशांत मडामे यांनी मानले.