शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

प्रचारात भाजपा-सेनेचे एकला चलो रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 00:39 IST

राज्यात भाजप-सेना युतीसाठी निवडणूक घोषित होण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत राजकीय नाट्य सुरू होते. अखेर हो नाही म्हणत युती झाली. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी लोकसभेच्या प्रचाराला लागण्याचे आदेश पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले.

ठळक मुद्देस्थानिक नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव : युतीधर्म केवळ नावापुरताच

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यात भाजप-सेना युतीसाठी निवडणूक घोषित होण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत राजकीय नाट्य सुरू होते. अखेर हो नाही म्हणत युती झाली. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी लोकसभेच्या प्रचाराला लागण्याचे आदेश पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले. वरिष्ठ पातळीवरील मनभेद दूर झाले असले तरी स्थानिक पातळीवर मतभेद दूर झालेच नाही. दोन्ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये अद्यापही समन्वय दिसत नसल्याने एकमेकांची साथ न घेता एकला चलो रे म्हणत प्रचाराला सुरूवात केल्याचे चित्र गोंदिया-भंडारा लोकसभा मतदार संघात पाहयला मिळत आहे.गुरूवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ११ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर १४ उमेदवार रिंगणात असून त्यांना चिन्ह वाटप सुध्दा झाले. त्यामुळे निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना प्रचारासाठी केवळ १२ दिवस मिळणार असून कमीत कमीत दिवसात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांनी दिवसरात्र एक केल्याचे चित्र आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात १४ उमेदवार जरी असले तरी खरी लढत राष्टÑवादी काँग्रेस आणि भाजपाच्या उमेदवारामध्ये होणार स्पष्ट आहे. युतीमध्ये हा मतदारसंघ भाजपच्या तर आघाडीत राष्टÑवादी काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. मात्र युतीमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या मतदारसंघावर आपला दावा केला त्यासाठीच उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही उघडपणे उमेदवारीला विरोध करीत निवडणुकीदरम्यान प्रचारात सहभागी न होता घरी बसणार अशी भूमिका सुध्दा शिवसैनिकांनी घेतली होती. त्यामुळेच या मतदारसंघात भाजप आणि शिवसेना यांच्यात सर्वच काही आॅलबेल नसल्याचे स्पष्ट झाले.मातोश्रीवरुन आदेश झाल्यानंतर दोन्ही जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी युतीचा धर्म म्हणून वैर बाजुला ठेवून युतीच्या उमेदवाराचा प्रचारात सक्रीयपणे सहभागी होणार असल्याचे जाहीर केले. मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळेच आहे. दोन्ही जिल्ह्यातील स्थानिक भाजपा नेते प्रचारा दरम्यान शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनासोबत घेत नसल्याचे चित्र आहे.एवढेच नव्हे तर प्रचारासाठी वाहने, प्रचार साहित्य यांची सुध्दा गरज आहे का याची सुध्दा विचारणा करीत नसल्याची भावना शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यांने व्यक्त केली. त्यामुळेच शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपाच्या निमंत्रणाची वाट न पाहता युतीधर्म म्हणून एकला चलो रे म्हणत प्रचाराला सुरूवात केली आहे.मात्र प्रचारासाठी मतदारांमध्ये जातांना भाजपा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते वेगवेगळे फिरत असल्याने मतदारांना सुध्दा खरोखरच युती झाली का असा प्रश्न पडत आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षाच्या एकला चलो रे भूमिकेचा फटका युतीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.दोन विधानसभेसाठी सेनेचे सर्जिकल स्ट्राईकभंडारा-गोंदिया लोकसभेची उमेदवारी शिवसेनेला मिळावी यासाठी दोन्ही जिल्ह्यातील उमेदवारांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. मात्र त्याला यश आले नाही. तर दुसरीकडे युती झाली असताना सुध्दा भाजपाचे स्थानिक नेते शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना महत्त्व देत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी सहा महिन्यांनी होणाºया विधानसभा निवडणुकांवर डोळा ठेवून गोंदिया व भंडारा विधानसभेत जनसंपर्क वाढविण्यास सुरूवात केली. या दोन्ही जागांची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली असून त्यादृष्टीने सेनेच्या पदाधिकाºयांनी सर्जीकल स्ट्राईक सुरू केले आहे.उमेदवाराचीही अडचणभाजपा-सेना युतीचा उमेदवार म्हणून भाजपाचा उमेदवार दोन्ही पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेवून चालण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र याला सोबत घेतले तर त्याला नाराजी अशी परिस्थिती निर्माण होत असल्याने उमेदवाराची चांगलीच अडचण होत आहे.

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेना