पोलिसांना येणाऱ्या अडचणींवर मात करण्याबाबत शिबिर

By Admin | Updated: September 29, 2014 00:41 IST2014-09-29T00:41:15+5:302014-09-29T00:41:15+5:30

येथील पोलीस मुख्यालयाच्या मिटींग हॉलमध्ये पोलीस अधीक्षक कैलाश कणसे यांचे अध्यक्षतेखाली पोलीस विभागामध्ये कर्तव्य बजावताना पोलिसांना येणाऱ्या अडचणींवर मात करण्याबाबतचे

The camp is about to overcome the problems of police | पोलिसांना येणाऱ्या अडचणींवर मात करण्याबाबत शिबिर

पोलिसांना येणाऱ्या अडचणींवर मात करण्याबाबत शिबिर

भंडारा : येथील पोलीस मुख्यालयाच्या मिटींग हॉलमध्ये पोलीस अधीक्षक कैलाश कणसे यांचे अध्यक्षतेखाली पोलीस विभागामध्ये कर्तव्य बजावताना पोलिसांना येणाऱ्या अडचणींवर मात करण्याबाबतचे मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन करण्यात आले.
पोलीस अधीक्षक कैलाश कणसे यांनी सर्व नवप्रविष्ठ महिला पोलीस प्रशिक्षणार्थी यांना मार्गदर्शन करून त्यांना आत्मविश्वास वाढविला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रेवती नागभिरे, देवश्री कोटांगले या उपस्थित होत्या. रेवती नागभिरे यांनी उपस्थित नवप्रविष्ट महिला पोलीस प्रशिक्षणार्थी यांच्या परिचर व आवड बाबत विचारणा केली. महिला या आदिशक्तीची रुपे आहेत. त्यांनी स्वत:ला कधीही कमी लेखू नये. आजच्या युगात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत. हे विविध उदाहरणे देऊन समजावून सांगितले. प्रमुख पाहुण्यांनी नवप्रविष्ट महिला पोलीस प्रशिक्षणार्थींशी संवाद साधून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा व पोलीस विभागात काम करीत असताना येणाऱ्या परिस्थितीवर मात करून कसलीही भीती मनात न बाळगता काम केले पाहिजे. याबाबत मार्गदर्शन केले. नवप्रविष्ठ महिला पोलीस प्रशिक्षणार्थी यांनी त्यांना उद्भविलेले प्रश्न रेवती नागभिरे यांना विचारले.
रेवती नागभिरे यांनी नवप्रविष्ट महिला पोलीस प्रशिक्षणार्थी यांना स्वत:चे स्वत: मध्ये सुधारणा आणून स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाची छाप दुसऱ्यावर कशी पडली पाहिजे आणि त्या व्यक्तीमत्वानेच आपली ओळख झाली पाहिजे, असा उपदेश याप्रसंगी दिलीा.
यावेळी शिबिराचे आयोजन राखीव पोलीस निरीक्षक पवार यांनी केले. संचालन व आभार प्रदर्शन तोडासे यांनी केले. शिबिराला महिला पोलीस कवायत निर्देशक रजीया शेख, कविता अंबादे हे हजर असून २८ नवप्रविष्ट महिला पोलीस प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: The camp is about to overcome the problems of police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.