प्रवासी निवारा परिसरात लागले कॅमेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 21:44 IST2018-07-13T21:43:51+5:302018-07-13T21:44:12+5:30

येथील प्रवासी निवारा येथे काही वर्षाआधी तंटामुक्त समितीतर्फे ३२ हजार खर्च करून येथे चार कॅमेरे लावण्यात आले होते. त्यामुळे बस प्रवासी निवारामध्ये प्रत्येक प्रवाशांना सुरक्षा वाटायची.

The cameras started in the residential premises | प्रवासी निवारा परिसरात लागले कॅमेरे

प्रवासी निवारा परिसरात लागले कॅमेरे

ठळक मुद्देग्रामपंचायतीचा पुढाकार : देखरेख करण्याची जबाबदारीही ग्रामपंचायतीवर

विशाल रणदिवे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : येथील प्रवासी निवारा येथे काही वर्षाआधी तंटामुक्त समितीतर्फे ३२ हजार खर्च करून येथे चार कॅमेरे लावण्यात आले होते. त्यामुळे बस प्रवासी निवारामध्ये प्रत्येक प्रवाशांना सुरक्षा वाटायची. परंतु लागलेले कॅमेरे जास्त काळ टिकू शकले नाही. कालांतराने अतिक्रमण हटाव मोहिमेत बंद कॅमेरेही हटावण्यात आले होते आणि तेव्हापासून बेपत्ता झालेले कॅमेरे याविषयीचे ‘लोकमत’ने वेळोवेळी वचा फोडली. याची दखल घेत प्रवासी निवारा अड्याळ येथे ग्रामपंचायतच्या पुढाकारातून कॅमेरे लावण्यात आले. यामुळे ग्रामस्थ तथा प्रवाशांनी ग्रामपंचायतचे आभार माणले.
अड्याळ प्रवासी निवारामध्ये रोज सकाळ सायंकाळ शाळेच्या वेळेवर जिकडे तिकडे विद्यार्थ्यांची गर्दी पाहायला मिळते. परंतु या दोन्ही वेळेला इथे एकही वाहतुक नियंत्रक नसल्यामुळे वाटेल तिथे मिळेल त्या ठिकाणी विद्यार्थी, प्रवासी, वाहने उभे असतात परंतु यामुळे धोका कधीही होऊ शकतो परंतु याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येते आणि जेव्हा एखादी घटना घडली की मग अचानकपणे पोलिसांचा ताफा दिसून येतो.
याला म्हणायचे तरी काय, तहाण लागल्यावर विहिर खोदण्याचे शहापणपण योग्य राहिल का की त्याआधीच प्रयत्न महत्वाचे आहे, हा एक प्रश्नच आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे उपयोगाचे कुणाचे, हाही एक प्रश्नच आहे. लावलेल्या कॅमेरा यंत्राचे वेळोवेळी देखभाल तसेच याची मुख्य यंत्रणा सध्या ग्रामपंचायतमध्ये आहे परंतु ही यंत्रणा पोलीस स्टेशन अड्याळ कार्यालयातच ठेवावी तसेच यानंतर पोलीस प्रशासनाने या यंत्रणाची जबाबदारी देखभाल करावी, अशी ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे. परंतु याला भंडारा पोलीस अधिक्षक मान्यता देणार की नाही अशीही चर्चा सध्या गावात रंगत आहे.
सीसीटीव्ही कॅमेरामुळे सर्वात जास्त मदत ग्रामस्थांना तर होईलच परंतु त्याहीपेक्षा पोलीस प्रशासनाला होऊ शकते. मागील अनेक वर्षापासून कॅमेरे बंद घरात कैद होते. आणि त्यांना पुन्हा कार्यान्वीत करण्याचे काम येथील ग्रामपंचायत कार्यालयाने केले आहे. यासाठी पुन्हा पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासनातर्फे प्रत्येकी एक एक कॅमेरा दिला तर प्रवासी निवारामध्ये पुन्हा सुरक्षेत भर पडू शकते.
अड्याळ बस प्रवासी निवारा मधील खड्डे बुजले आणि कॅमेरे लावण्यात आले परंतु आजही मोठा प्रकाश देणारे पथदिवे लागले नाही. याहीमुळे इथे अंधारातच प्रकाश दिसतो. बस प्रवासी निवारा येथे सुट्टी झाल्यानंतर विद्यार्थी घराला जाण्यास बेकाबु दिसतात त्यामुळेच की काय बस आल्यानंतर संपूर्ण विद्यार्थी धाव घेतात यामुळे मोठा अपघात कधीही याठिकाणी होवू शकतो. याची शक्यताही नाकारता येत नाही. लागलेले कॅमेरे आपला काम करतीलच परंतु अपघात होणार नाही यासाठी याठिकाणी कुणाची आणि कशाची आवश्यकता आहे याची खबरदारी घेणार कोण, हा एक मोठा प्रश्न आहे.
बसप्रवासी निवारामध्ये विद्यार्थ्यांची मदत करणार कोण याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहेत.

याविषयीची माहिती गावातील शाळा, कॉन्व्हेंट व पोलीस स्टेशनला दिली आहे. चक्क प्रकाश देणारे स्ट्रीट लाईट लवकरच लावण्यात येईल, अशी माहिती भ्रमणध्वनीद्वारे मिळाली.
-जयश्री कुंभलकर,
सरपंच अड्याळ.

Web Title: The cameras started in the residential premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.