सिहोरा केंद्रावर रात्री उशिरापर्यंत धान खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 05:00 AM2020-07-01T05:00:00+5:302020-07-01T05:00:06+5:30

सिहोरा येथील सहकारी राईस मिलमध्ये आधारभूत धान खरेदी केंद्राला मान्यता देण्यात आली. मात्र धान खरेदी केंद्रावर नियोजनाअभावी प्रत्येक सत्रात गोंधळ निर्माण होत होता. व्यापाऱ्यांचा धान खरेदी करीत असल्याचा आरोप शेतकरी करीत होते. मात्र याकडे कुणाचेही लक्ष नव्हते. सिहोरा येथील धान खरेदी केंद्रावर सहा हजार क्विंटल पेक्षा अधिक धानाची आवक वाढली.

Buy grain late at night at Sihora Center | सिहोरा केंद्रावर रात्री उशिरापर्यंत धान खरेदी

सिहोरा केंद्रावर रात्री उशिरापर्यंत धान खरेदी

Next
ठळक मुद्देमुदतवाढीची प्रतीक्षा : शेकडो क्विंटल धान मोजणीच्या प्रतीक्षेत, शेतकऱ्यांची चिंता वाढली

लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केल्यानंतर सोमवारी उशिरा रात्रीपर्यंत तुमसर तालुक्यातील सिहोरा येथील आधारभूत धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आली. या केंद्राच्या गलथान कारभाराचे वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यानंतर प्रशासन खळबळून जागे झाले.
सिहोरा येथील सहकारी राईस मिलमध्ये आधारभूत धान खरेदी केंद्राला मान्यता देण्यात आली. मात्र धान खरेदी केंद्रावर नियोजनाअभावी प्रत्येक सत्रात गोंधळ निर्माण होत होता. व्यापाऱ्यांचा धान खरेदी करीत असल्याचा आरोप शेतकरी करीत होते. मात्र याकडे कुणाचेही लक्ष नव्हते. सिहोरा येथील धान खरेदी केंद्रावर सहा हजार क्विंटल पेक्षा अधिक धानाची आवक वाढली. दरम्यान पोर्टल बंद असल्याच्या कारणावरून शनिवारपासून धान खरेदी बंद करण्यात आली होती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर पर्याय शोधण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला. सोमवारी सकाळी शेतकऱ्यांनी केंद्र बंद असल्याने संताप व्यक्त केला. सायंकाळी ७ वाजतापासून अखेर धान खरेदीला सुरुवात झाली ती पहाटे ३ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात आली. मंगळवारी सकाळी ६ वाजतापासून पुन्हा मैदानात उघड्यावर असलेल्या धानाची सुरु करण्यात आली. तब्बल ७०० क्विंटल धानाची खरेदी झाल्याची माहिती आहे.
धान खरेदी केंद्रांना अद्याप मुदतवाढ मिळाले नाही. ३० जून हा शेवटचा दिवस असल्याने शेतकरी धान मोजण्यासाठी दबाव निर्माण करीत असल्याचे चित्र होते. सिहोरा परिसरातील अनेक केंद्रावर धान मोजणीच्या प्रतीक्षेत आहेत. धानाची विक्री होणार की नाही अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे.

केंद्राबाहेर धान प्रतीक्षेत
सिहोरा आधारभूत धान खरेदी केंद्राच्या बाहेर चार हजार क्विंटल धान मोजण्याच्या प्रतीक्षेत आहेत. एवढा मोठा धान एका दिवसात खरेदी करणे दिव्य आहे. धानाचे मोजमाप झाले तरी यात शेतकऱ्यांच्या धानाची नोंदणी करणे गरजेचे आहे. यासाठी धान खरेदीला मुदतवाढ मिळणे अपेक्षित आहे.

Web Title: Buy grain late at night at Sihora Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.