बसची दुचाकीला धडक तरूणी गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 23:15 IST2017-09-10T23:15:25+5:302017-09-10T23:15:55+5:30
दूचाकीला बसने मारलेल्या धडकेत एका युवतीला गंभीर दुखापत झाली. सुदैवाने ती थोडक्यात बचावली.

बसची दुचाकीला धडक तरूणी गंभीर जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : दूचाकीला बसने मारलेल्या धडकेत एका युवतीला गंभीर दुखापत झाली. सुदैवाने ती थोडक्यात बचावली. जखमी युवतीचे नाव लक्की सुशिल बन्सोड (१८) रा. देव्हाडी असे आहे. हा अपघात तुमसर - देव्हाडी मार्गावर आरएसजीके शाळेजवळ रविवारी दुपारी १.३० वाजता घडला.
लक्की बन्सोड देव्हाडी येथून दूचाकी क्र. एम एच ३६ टी १७८० ने तुमसरला येत होती. आरएसजीके शाळेजवळील पुलाजवळ बस क्र. एम एच ०७ सी ९४४६ तुमसर कडून विरुध्द दिशेने येत होती. पूलाजवळ ट्रॅक्टर ट्रॉली उभी होती. लक्कीला बस समोरुन येणारी बस दिसली नाही. पाठीमागे पुन्हा दुसरे वाहन येत होते. दरम्यान लक्कीने दूचाकी समोर नेली. यात बसची लक्कीला धडक बसली. लक्कीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रक्ताच्या थारोळ्यात तिला रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. रुग्णालयात लहान शस्त्रक्रिया करण्यात आली. तुमसर पोलीस पुढील तपास करीत आहे.