बससेवा बंद केल्यामुळे प्रवाशांना फटका
By Admin | Updated: May 8, 2014 01:27 IST2014-05-08T01:27:05+5:302014-05-08T01:27:05+5:30
भंडारा आगारतून सुटणारी भंडारा-मांडवी ही बससेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.

बससेवा बंद केल्यामुळे प्रवाशांना फटका
भंडारा : भंडारा आगारतून सुटणारी भंडारा-मांडवी ही बससेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
भंडारा तालुक्यातील खमारी बुटी जि.प. क्षेत्रातील मांडवी हे गाव तालुक्यातील शेवटचे गाव असून या ठिकाणापासून अनेक गावे भंडारा शहरापर्यंत जोडली आहेत. या मार्गावरून येणारे प्रवासी शैक्षणिक दृष्टीने शासकीय कामानिमित्त्य व व्यापाराच्या दृष्टीने आसपासच्या ग्रामीण जनतेला भंडाराकडेच कुच करावे लागते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी आर्थिकदृष्ट्या परवडणारी पास सेवा एसटी महामंडळातर्फे करण्यात येते.
भंडारा-मांडवी ही सकाळी ९ वाजताची बस अतिशय उपयुक्त होती. त्यामुळे या बसमध्ये प्रवाशांची व विद्यार्थ्याची गर्दी राहायची. ही बस महामंडळाच्या अधिकार्यांनी ऐन लग्न सराईत बंद केल्यामुळे या मार्गावरील ग्रामीण जनतेची कुचंबना होत आहे. या जनतेला आता खासगी वाहनांचा आधार घेतल्याशिवाय पर्याय नाही. त्याकरिता प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रिदवाक्य असणार्या एसटी महामंडळाच्या अधिकार्यांनी प्रवाशाची होणारी गैरसोय लक्षात घेता सदर बस त्वरीत सुरू करण्याची मागणी मनसेचे तालुका अध्यक्ष विशाल लांजेवार, धनंजय धुळसे, मनोहर खरोले, नजीर बांते, हरीश पंचबुद्धे, अंकुश मारवाडे, मनोज रेहपाडे, कमलेश मेश्राम आदींनी केली आहे. (प्रतिनिधी)