विरलीत घर जळून भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:11 IST2018-01-18T00:11:15+5:302018-01-18T00:11:42+5:30
येथील इंदूबाई देवराम पत्रे यांच्या घराला बुधवारला आग लागल्याची घटना घडली. या आगीत संसारोपयोगी साहित्यासह ८ हजारांची रोख जळाली.

विरलीत घर जळून भस्मसात
आॅनलाईन लोकमत
विरली (बु) : येथील इंदूबाई देवराम पत्रे यांच्या घराला बुधवारला आग लागल्याची घटना घडली. या आगीत संसारोपयोगी साहित्यासह ८ हजारांची रोख जळाली. या आगीत एक लाख रूपयाचे नुकसान झाले असून आगीमुळे पत्रे कुटुंबांचा संसार उघड्यावर आला आहे.
मुलगा व सुनेसोबत मोलमजुरी करुन संसाराचा गाडा रेटणाऱ्या इंदुबाई घटनेच्या वेळी कुटंूबीयासह शेतावर गेल्या होत्या. घराला आग लागल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी आग विझवून आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत घरातील टी.व्ही. संच, कुलर, धान्य, लाकडी पलंग व इतर संसारोपयोगी साहित्य व ८ हजार रूपये रोख जळाले. घटनेची माहिती मिळताच विरलीचे कोतवाल बाबा रामटेके यांनी घटनास्थळाी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाºया इंदुबाईला शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी गावकºयांनी केली आहे.