आगीच्या तांडवात धानाचे पुंजणे जळून खाक
By Admin | Updated: May 10, 2014 02:24 IST2014-05-10T00:14:49+5:302014-05-10T02:24:13+5:30
परसोडी (पोवारटोली) येथील दोन शेतकऱ्यांनी ठेवलेल्या धानाच्या पुंजण्याला अचानक आग लागली. यात शेतकर्यांचे ४८ हजाराचे नुकसान झाले.

आगीच्या तांडवात धानाचे पुंजणे जळून खाक
साकोली : परसोडी (पोवारटोली) येथील दोन शेतकर्यांनी ठेवलेल्या धानाच्या पुंजण्याला अचानक आग लागली. यात शेतकर्यांचे ४८ हजाराचे नुकसान झाले. आगीमध्ये एक धानाचा पुंजणा, तणीसीचे ढिग, बैलबंडी जळून खाक झाले.
परसोडी पोवारटोली येथील शेतकरी आनंद पटले यांचे तीन एकर शेतीमध्ये उन्हाळी धानपिकाची लागवड केली. कापणी करून आपले घराशेजारील शिवारात धानाचे पुंजणे रचून ठेवले होते. या पुंजण्याजवळ तणसीचे ढिग व ब्रिजलाल पटले या शेतकर्याची बैलबंडी व लाकडी मयाली ठेवलेल्या होत्या. रात्री जेवण करून सर्वजण झोपले असताना अचानक धानाच्या पुंजण्याला रात्री ११.३0 च्या सुमारास आग लागली. सदर शेतकर्यांनी आग विझविण्याचे आटोकाट प्रयत्न केले. मात्र, आगीची तिव्रता एवढी भयानक होती की आगीच्या तांडवात आनंदराव पटले यांचे दोन ते तीन एकरातील धानाचा पुंजणा व तणसीचे ढिग किंमत ३0 हजार तर ब्रिजलाल पटले यांची बैलबंडी व लाकडी मयाली किंमत १८ हजार रूपये नुकसान झाले आहे.
परसोडीचे तलाठी दिनेश सिडाम व सहकारी वाघाडे यांनी घटनास्थळाला भेट देवून घटनेचा पंचनामा केला आहे. सदर शेतकर्यांनी नुकसान भरपाई मिळविण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे वेळीच पोलीस स्टेशन साकोली येथे घटनेची माहिती देऊन अग्निशमन दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आले. मात्र अग्निशमन दल वेळीच पोहचले नसल्याने शेतकर्यांचे नुकसान झाले.
(तालुका प्रतिनिधी)