शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
2
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
3
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
4
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
5
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
6
राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
7
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
9
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
10
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
11
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
12
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
13
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   
14
पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?
15
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!
16
परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सोडला, दिग्दर्शक प्रियदर्शन यांची आली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणाचे नाव बदलून 'शहीद हिंदू घाटी पर्यटन स्थळ' करा, उच्च न्यायालयात याचिका
18
भाच्याच्या प्रेमासाठी पतीची हत्या करुन शेजाऱ्यांना पाठवलं जेलमध्ये, सत्य समजताच हादरले पोलीस
19
3 दिवसांत सर केली हिमालयाची 5 शिखरे, CISFच्या महिला अधिकाऱ्याची ऐतिहासिक कमगिरी
20
जम्मू-काश्मीरमधील सुरनकोट मंदिरावरील हल्ल्यात पाकिस्तानचा हात; SIA कडून मोठा खुलासा

घरफोडी, चोरीच्या घटनांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2015 01:18 IST

लग्नसराई व सुट्यांमुळे बाहेरगावी गेलेल्या कुटूंबीयांच्या घरात शिरून घरफोडी व चोरी करण्याच्या घटनांमध्ये महिनाभरापासून वाढ झाली आहे.

भंडारा : लग्नसराई व सुट्यांमुळे बाहेरगावी गेलेल्या कुटूंबीयांच्या घरात शिरून घरफोडी व चोरी करण्याच्या घटनांमध्ये महिनाभरापासून वाढ झाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने चोरीच्या घटना उजेडात आणून आरोपीना गजाआड केले असले तरी चोरट्यांवर वचक बसलेला नाही. मागील २० दिवसांच्या कालावधीत विविध पोलिस ठाण्यांर्गत धाडसी घरफोडी व चोरीच्या घटना घडल्या असून लाखो रुपयांच्या मालावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. उन्हाळा सुरु होताच ग्रामीण भागातील नागरिक घराबाहेर खाट टाकून किंवा दाराला कुलूप लावून छतावर झोपी जातात. कुलर सुरु असल्याने चोरट्यांची चाहूल लागणे कठीण होऊन बसते. लग्नसराई व सुट्यांमध्ये बाहेरगावी व पर्यटनाला जाणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असते. दिवसा आपल्या माणसाच्या माध्यमातून टेहाळणी करुन नजर ठेवणारे भुरटे व मोठे चोर रात्रीच्या वेळी अत्यंत शिताफीने चोऱ्या करीत आहेत. (नगर प्रतिनिधी)दागिने लांबविणारी टोळी सक्रियलग्नसराईच्या दिवसात महिला वर्गाला दागिने घालून मिरवायची हौस असते ही हौस महिलांच्या अंगलट येत आहे. रस्त्याने जाणाऱ्या एकट्या महिलेच्या गळातील मंगळसूत्र, चपलाकंठी, चेन यासारखे सोन्याचे दागिने हिसकावून मोटारसायकलने पळून जाणाऱ्या भामट्यांची तसेच गर्दीच्या ठिकाणावरुन दागिणे लांबविणारी टोळी सध्या सक्रीय झाल्याचे दिसून येते.लग्नसमारंभाचा हंगाम हा अशा भुरट्या चोरांसाठी सुगीचा काळ ठरतो. सध्या बसमधून प्रवास करण्यासाठी मोठी गर्दी असते. या गर्दीचा लाभ घेत महिलांच्या बॅगेतून त्यांच्या गळयातून अगदी बेमालूमपणे दागिने लांबविणारी टोळी सक्रिय झाली आहे. याच आठवड्यात अशा दोन घटना तुमसर व भंडारा स्थानकावर घडल्या आहेत. दोन वर्षापूर्वी अशाप्रकारे दागिणे लांबविणाऱ्या महिलांच्या एका टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अशा प्रकारच्या घटनांमध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक सदस्य टोळीने हे काम करतात. यात महिलांसह, लहान मुले व पुरुष मंडळीचाही सहभाग असतो. यासाठी घराबोहर पडताना वा प्रवास करताना अंगावर सोन्याचे दागिने घालण्याचा मोह टाळावा, प्रवासात आपल्या साहित्याचा अत्यंत काळजीपुर्वक सांभाळ करणे गरजेचे आहे.बसस्थानकावरुन प्रवाशांना सुरक्षितपणे प्रवास करता यावा, चोरी, पॉकीटमारी, चैन स्रॅचिंंग, भांडण-तंटे यासारख्या घटना घडू नये, यासाठी बसस्थानकावर पोलिस चौकी आहे. परंतु पोलिस मात्र चौकीच्या आतच बसून राहत असल्याने बसस्थानकावर काय घडते? याबाबत पोलिस अनभिज्ञ असतात. पोलिसांच्या नजरेतून चोरटे सुटत असल्याने बसस्थानकावर चोरांची टोळी सराईतपणे वावरत असल्याचे स्पष्ट होते.