घरफोडी, चोरीच्या घटनांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2015 01:18 IST2015-05-17T01:18:56+5:302015-05-17T01:18:56+5:30

लग्नसराई व सुट्यांमुळे बाहेरगावी गेलेल्या कुटूंबीयांच्या घरात शिरून घरफोडी व चोरी करण्याच्या घटनांमध्ये महिनाभरापासून वाढ झाली आहे.

Burglary, increase in theft cases | घरफोडी, चोरीच्या घटनांमध्ये वाढ

घरफोडी, चोरीच्या घटनांमध्ये वाढ

भंडारा : लग्नसराई व सुट्यांमुळे बाहेरगावी गेलेल्या कुटूंबीयांच्या घरात शिरून घरफोडी व चोरी करण्याच्या घटनांमध्ये महिनाभरापासून वाढ झाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने चोरीच्या घटना उजेडात आणून आरोपीना गजाआड केले असले तरी चोरट्यांवर वचक बसलेला नाही.
मागील २० दिवसांच्या कालावधीत विविध पोलिस ठाण्यांर्गत धाडसी घरफोडी व चोरीच्या घटना घडल्या असून लाखो रुपयांच्या मालावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. उन्हाळा सुरु होताच ग्रामीण भागातील नागरिक घराबाहेर खाट टाकून किंवा दाराला कुलूप लावून छतावर झोपी जातात. कुलर सुरु असल्याने चोरट्यांची चाहूल लागणे कठीण होऊन बसते. लग्नसराई व सुट्यांमध्ये बाहेरगावी व पर्यटनाला जाणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असते. दिवसा आपल्या माणसाच्या माध्यमातून टेहाळणी करुन नजर ठेवणारे भुरटे व मोठे चोर रात्रीच्या वेळी अत्यंत शिताफीने चोऱ्या करीत आहेत. (नगर प्रतिनिधी)

दागिने लांबविणारी टोळी सक्रिय
लग्नसराईच्या दिवसात महिला वर्गाला दागिने घालून मिरवायची हौस असते ही हौस महिलांच्या अंगलट येत आहे. रस्त्याने जाणाऱ्या एकट्या महिलेच्या गळातील मंगळसूत्र, चपलाकंठी, चेन यासारखे सोन्याचे दागिने हिसकावून मोटारसायकलने पळून जाणाऱ्या भामट्यांची तसेच गर्दीच्या ठिकाणावरुन दागिणे लांबविणारी टोळी सध्या सक्रीय झाल्याचे दिसून येते.
लग्नसमारंभाचा हंगाम हा अशा भुरट्या चोरांसाठी सुगीचा काळ ठरतो. सध्या बसमधून प्रवास करण्यासाठी मोठी गर्दी असते. या गर्दीचा लाभ घेत महिलांच्या बॅगेतून त्यांच्या गळयातून अगदी बेमालूमपणे दागिने लांबविणारी टोळी सक्रिय झाली आहे. याच आठवड्यात अशा दोन घटना तुमसर व भंडारा स्थानकावर घडल्या आहेत.
दोन वर्षापूर्वी अशाप्रकारे दागिणे लांबविणाऱ्या महिलांच्या एका टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अशा प्रकारच्या घटनांमध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक सदस्य टोळीने हे काम करतात. यात महिलांसह, लहान मुले व पुरुष मंडळीचाही सहभाग असतो. यासाठी घराबोहर पडताना वा प्रवास करताना अंगावर सोन्याचे दागिने घालण्याचा मोह टाळावा, प्रवासात आपल्या साहित्याचा अत्यंत काळजीपुर्वक सांभाळ करणे गरजेचे आहे.
बसस्थानकावरुन प्रवाशांना सुरक्षितपणे प्रवास करता यावा, चोरी, पॉकीटमारी, चैन स्रॅचिंंग, भांडण-तंटे यासारख्या घटना घडू नये, यासाठी बसस्थानकावर पोलिस चौकी आहे. परंतु पोलिस मात्र चौकीच्या आतच बसून राहत असल्याने बसस्थानकावर काय घडते? याबाबत पोलिस अनभिज्ञ असतात. पोलिसांच्या नजरेतून चोरटे सुटत असल्याने बसस्थानकावर चोरांची टोळी सराईतपणे वावरत असल्याचे स्पष्ट होते.

Web Title: Burglary, increase in theft cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.